राज्यमार्ग दुरुस्तीसाठी तुमसरमध्ये चार तास चक्का जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:31 IST2021-01-17T04:31:00+5:302021-01-17T04:31:00+5:30
तुमसर-बपेरा राज्यमार्ग शहरातील संत रविदासनगरमधून बपेराकडे जातो. पुढे हा मार्ग मध्य प्रदेशशी जोडला गेला आहे. तसेच बावनथडी नदीवरील पुलामुळे ...

राज्यमार्ग दुरुस्तीसाठी तुमसरमध्ये चार तास चक्का जाम
तुमसर-बपेरा राज्यमार्ग शहरातील संत रविदासनगरमधून बपेराकडे जातो. पुढे हा मार्ग मध्य प्रदेशशी जोडला गेला आहे. तसेच बावनथडी नदीवरील पुलामुळे वाहतूक बंद असून, ती बपेरामार्गे वळती केली. या मार्गावरून अवजड वाहने आणि भरधाव रेती वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. अनेकदा अपघात होऊन प्राण गमावण्याची अहोरात्र वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. या रस्त्याच्या डागडुजीसाठी वारंवार बांधकाम विभागाला विनंती करण्यात आली. परंतु कुणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे नागरिकांनी तुमसर-बपेरा राज्यमार्गावर चक्का जाम आंदोलन सुरू केले. आंदोलनाची दखल घेत आमदार राजू कारेमोरे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी चन्ने यांना तातडीने बोलावून घेतले. मार्ग काढण्यास सांगितले. आठवडाभरात भडके यांच्या घरापासून ते मोठा बाजारापर्यंत रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. त्यावरून आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात तिलक गजिभये, नगरसेवक सलाम तुरक, सुरेश कनोजे, शालिक भोंडेकर, जाकीर तुरक, अश्विन गभणे, शुभम गभणे यांच्यासह संत रविदास नगरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.