शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

अनुसूचित जाती, जमाती उमेदवारांना मिळणार केंद्राच्या नमुन्यातील जातीचे प्रमाणपत्र

By admin | Published: June 22, 2017 12:32 AM

अनुसूचित जाती, अनुसूचित जनजातीच्या उमेदवारांना केंद्राच्या जातीच्या प्रमाणपत्राच्या सुधारित विहित नमुन्यात जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येणार आहे.

कॉस्ट्राईबच्या प्रयत्नांना यश : सक्रिय प्रतिसादाबद्दल एसडीओंचे मानले आभारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :अनुसूचित जाती, अनुसूचित जनजातीच्या उमेदवारांना केंद्राच्या जातीच्या प्रमाणपत्राच्या सुधारित विहित नमुन्यात जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येणार आहे. यासाठी कास्ट्राईब संघटनेने पुढाकार घेतला होता. मागणीची पुतर्ता झाल्यामुळे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचे संघटनेनी आभार मानले.राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी भारत सरकारच्या केंद्रीय कार्यालयात, वा राष्ट्रीयकृत बँका इत्यादी ठिकाणी निवड झाल्यानंतर नियुक्ती होण्यापूर्वी त्यांच्याकडून केंद्र सरकारच्या जातीच्या प्रमाणपत्राच्या संशोधित विहित सुधारित नमुन्यात जातीच्या प्रमाणपत्राची सक्ती करण्यात येते. परंतु बऱ्याच जिल्ह्यात वेळोवेळी "अ‍ॅमेंडमेंड" झालेल्या सुधारित विहित नमुन्यात जातीचे प्रमाणपत्र संबंधित एसडीओकडून निर्गमित करण्यात न येता जुन्याच नमुन्यात असे जातीचे प्रमाणपत्र निर्गमीत करण्यात येत होते. असे जुन्या नमुन्यातील प्रमाणपत्र संबंधित नियुक्ती अधिकारी स्वीकारीत नसल्यामुळे अनेकांना महद्प्रयासाने मिळालेली नोकरी गमाविण्याची पाळी येत होती. यासंबंधी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाकडे तक्रारी आल्यानंतर संघटनेने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य भंडारा दौऱ्यावर आले असताना सर्कीट हाऊसमध्ये त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली, लेखी निवेदन दिले व अन्याय झालेल्या उमेदवारांची बाब त्यांच्या लक्षात आणून दिली. दरम्यान संघटनेने समाज कल्याण मंत्री, समाज कल्याण सचिव, बार्टीचे संचालक इत्यादींनाही भेटून लेखी निवेदन दिले व पाठपुरावा सुरु ठेवला. विशेषत: अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य सी.एल. थुल यांनी या प्रकरणाची दखल घेवून विभागीय आयुक्तांना लेखी विचारणा केली. विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना व जिल्हाधिकाऱ्यांनी एडीओंना विचारणा केल्यामुळे सुधारित नमुन्यात जातीचे प्रमाणपत्र देणे सुरु झाले आहे. केंद्राच्या जातीच्या प्रमाणपत्राच्या सुधारित विहित नमुन्यात जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करीत असल्याचे कास्ट्राईब संघटनेला लेखी कळविल्यामुळे, संघटनेने एकाशिष्ट मंडळाद्वारे उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांची भेट घेवून त्यांच्या सक्रीय प्रतिसादाबद्दल त्यांचे लेखी धन्यवाद मानले. शासकीय आदिवासी वस्तीगृहातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बदल्याविषयी सुद्धा चर्चा केली. शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य ज्येष्ठ उपाध्यक्ष अमृत बन्सोड, भंडारा जिल्हा अध्यक्ष गुलशन गजभिये, सचिव नरेंद्र बन्सोड, मुख्य संघटन सचिव रुपचंद रामटेके, कार्याध्यक्ष अशोक बन्सोड, ज्येष्ठ उपाध्यक्ष पी.डी. शहारे, कार्यालयीन सचिव आनंद गजभिये, अतिरिक्त सचिव मोरेश्वर गेडाम, संघटन सचिव अर्जुन गोडबोले, करण रामटेके, सल्लागार डी.एफ. कोचे, उपाध्यक्ष आदिनाथ नागदेवे इत्यादींचा समावेश होता.