सोरणा प्रकल्पाला केंद्रीय वनविभागाची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 22:57 IST2018-10-13T22:56:58+5:302018-10-13T22:57:12+5:30
मोहाडी तालुक्यातील सोरणा प्रकल्पासाठी वनविभागाचा असलेला अडसर दूर झाला असून केंद्रीय वनविभागाने याला परवानगी दिली. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाचे कार्य सुरु होईल अशी माहिती आमदार चरण वाघमारे यांनी दिली.

सोरणा प्रकल्पाला केंद्रीय वनविभागाची परवानगी
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मोहाडी तालुक्यातील सोरणा प्रकल्पासाठी वनविभागाचा असलेला अडसर दूर झाला असून केंद्रीय वनविभागाने याला परवानगी दिली. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाचे कार्य सुरु होईल अशी माहिती आमदार चरण वाघमारे यांनी दिली.
बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोरणा मध्यप प्रकल्पात सोडण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती. सद्यस्थितीत सोरणा प्रकल्पाला बावनथडीतून पाणी देण्याचे कोणतेही नियोजन केले नाही. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी पाण्यासाठी वंचित राहतात.
आमदार चरण वाघमारे यांनी यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा केला. सोरणा तलावात पाणी सोडण्याची मागणी केली. आता या पाठपुराव्याला यश आले असून केंद्रीय वनविभागाच्या अखत्यारीतील वनजमीन असलेला गुंता लक्षात घेऊन केंद्रीय वनविभागाच्या मंजुरीअधीन राहून महाराष्ट्र शासनाने याला मंजुरी दिली आहे.
या कामाचे टेंडरही निघाले आहे. भारत सरकारच्या पर्यावरण वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाकडून १० आॅगस्टला मिळालेल्या परवानगीने लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. अशी माहिती आमदार वाघमारे यांनी दिली. सोरणा प्रकल्पाचे कार्य लवकरच सुरु होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी सोरणा परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत होती.