शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ’ शाळांना मिळणार केंद्राचा पुरस्कार

By admin | Updated: July 9, 2016 00:36 IST

केंद्र सरकारच्या मनुष्य बळ विकास मंत्रालयाकडून आता देशातील सर्व शाळांसाठी स्वच्छ विद्यालय हा पुरस्कार सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हा, राज्य व राष्ट्रीयस्तरावर गौरव३१ जुलैपर्यंत नोंदणी, शासकीय व अनुदानित शाळा पात्र भंडारा : केंद्र सरकारच्या मनुष्य बळ विकास मंत्रालयाकडून आता देशातील सर्व शाळांसाठी स्वच्छ विद्यालय हा पुरस्कार सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राने २ आॅक्टोबर २०१४ पासून देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरवात केली आहे. त्या अभियानाचा भाग म्हणूनच सर्व शाळांसाठी स्वच्छ विद्यालय हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य संपन्न जीवनाचा लाभ मिळावा तसेच सर्व रोगांपासून मुक्त अशा निरामय व आनंदी जीवनाचा लाभ मिळावा यासाठी १ ते ३१ आॅक्टोबर २०१५ या कालावधीत ‘स्वच्छ विद्यालय, स्वच्छ महाराष्ट्र मोहीम राज्यात राबविण्यात आली होती. केंद्राने या विशेष अभियानाची दखल घेत राज्याचा हा कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावर लागू केला आहे. देशाची भावी पिढी शाळामध्ये आकार घेत असते. मुलांना लहान वयात लागलेल्या सवयी आयुष्यभर पुरतात. स्वच्छतेची सवय जर शाळेतील मुलांना लागली तर येणारी पिढी ही आरोग्य संपन्न व सुदृढ निपजेल. म्हणूनच असे कार्यक्रम हाती घेवून ते यशस्वी करण्याचा मानस या पुरस्काराच्या माध्यमातून शासनाने व्यक्त केला आहे. या पुरस्कारासाठी शासकीय व अनुदानित शाळा पात्र असून त्यांना पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे. राष्ट्रीय पातळीवर १०० शाळा, राज्य पातळीवर ४० शाळा आणि जिल्हा पातळीवर ४८ शाळांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. यातील ७० टक्के पुरस्कार हे ग्रामीण भागातील शाळांना देण्यात येतील. पुरस्कारासाठी शाळांमध्ये पाण्याची उपलब्धता, शौचालयाची व्यवस्था, हात धुण्याची व्यवस्था, देखभाल व्यवस्था, वर्तणूक बदल व क्षमता विकास अशा ५ क्षेत्रांमध्ये एकूण ३९ घटक निश्चित करण्यात आले आहेत. शाळांना प्राप्त होणारे गुण विचारात घेवून त्यांची श्रेणी निश्चित करण्यात येईल व त्यावरूनच पुरस्कार विज्येत्या शाळेची निवड केली जाईल. शाळांना ३१ जुलैपूर्वी या पुरस्कारासाठी अर्ज करायचा आहे. त्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. शाळांमधील संस्कार कायमस्वरूपी राहतील असा या मागचा उद्देश आहे. (शहर प्रतिनिधी) पुरस्कारासाठी व्हीसीशिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी ५ जुलैला खास व्हीसी लावून याबाबत माहिती दिली. यावेळी उपसचिव डॉ. सुवर्णा खरात, विद्या परिषदचे संचालक गोविंद नांदेडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक नामदेव जरग, युनीसेफचे आनंद बोरसे, सिद्धेश वाडकर यावेळी उपस्थित होते. निवड समितीचे गठणतालुका, जिल्हा व राज्य स्तरावर शाळा निवडीसाठी समित्या गठीत करण्यात येईल. तालुकास्तर समितीचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी, जिल्हास्तर समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी तर राज्यस्तर समितीचे अध्यक्ष शिक्षण विभागाचे प्रधान सचिव असणार आहेत.गुणांचे निकष व संकेत ९० ते १०० गुण हिरवा रंग ७५ ते ८९ गुण निळा रंग ५१ ते ७४ गुण पिवळा रंग३५ ते ५० गुण केशरी रंग३५ पेक्षा कमी लाल रंगव्हीडीओ कॉन्फरन्सीगमधून शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार यांनी सुचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील गट शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येईल. शिक्षण विभागाच्या परिपत्रकाची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल.-किसन शेंडे, शिक्षणाधिकारी भंडारा.शासनाचा हा स्तूत्य उपक्रम आहे. उशिरा का होईना एकदाचा स्वच्छ शाळांना पुरस्कार मिळतील. स्वच्छ, सुंदर व आदर्श शाळा ठेवणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची ही पोचपावती ठरणार आहे. पुरस्कार मिळणार असल्याने शिक्षकांना प्रोत्साहन मिळणार आहे.-मुबारक सय्यद, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, भंडारा.