शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

होळी पेटवून नव्हे वृक्ष पूजनाने साजरी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 5:00 AM

होळी हा खरा तर आनंदाचा सण. होळी पेटवायची ती दृष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी. होळीत जळून गेलेल्या असत्य प्रवृत्तीनंतर तावूनसलाकून निघालेल्या सत्प्रवृत्तीचे. आपला प्रत्येक सण हा प्रतीकात्मक आहे. होळीची पूजा म्हणजे दृष्टप्रवृत्तीचे दहन आणि सत्प्रवृत्तीचे पूजन असते. परंतु अलिकडे या होळीलाही वेगळाच रंग लागला आहे. वारेमाप वृक्षतोड करून होळी पेटविली जाते. 

ठळक मुद्देवृक्षतोड थांबवा : सणाचे पावित्र जपत कोरोना संसर्गही टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सणामागची शास्त्रीय, धार्मिक पार्श्वभूमी लक्षात न घेता केवळ मौजमजा म्हणून अलिकडे सण साजरे केले जातात. होळीच्या सणाचेही तेच होत आहे. दृष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा म्हणून होलिका पूजन करून अमंगळ होळीत जाळले जाते. परंतु आता वारेमाप वृक्षतोड करून होळीत लाकडे पेटविली जात आहे. यातून पर्यावरणाची हानी तर होतेच सोबत वृक्षतोडही वाढते. या सर्व प्रकाराला आळा घालायचा असेल तर होळी पेटवून नव्हे तर वृक्ष पूजनाने साजरी करण्याची गरज आहे. त्यातच यंदा कोरोनाचे सावट असल्याचे होळी, धुळवळ आणि रंगपंचमी घरच्या घरीच साजरी करून प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. होळी हा खरा तर आनंदाचा सण. होळी पेटवायची ती दृष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी. होळीत जळून गेलेल्या असत्य प्रवृत्तीनंतर तावूनसलाकून निघालेल्या सत्प्रवृत्तीचे. आपला प्रत्येक सण हा प्रतीकात्मक आहे. होळीची पूजा म्हणजे दृष्टप्रवृत्तीचे दहन आणि सत्प्रवृत्तीचे पूजन असते. परंतु अलिकडे या होळीलाही वेगळाच रंग लागला आहे. वारेमाप वृक्षतोड करून होळी पेटविली जाते. प्रत्येक गावात एक दोन होळी पेटते. एका होळीत एक क्विंटल लाकडे, जळत असतील तर एकट्या भंडारा जिल्ह्यातच हजारो क्विंटल लाकूड भस्मसात होते. यातून प्रदूषणाचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. पूर्वी होळीमध्ये शेणापासून तयार केलेल्या चाकोल्या आणि ग्रामसफाईतून आलेला केरकचरा जाळला जायचा. मात्र आता थेट वृक्ष तोडून होळी पेटविली जाते. हा प्रकार खरे तर टाळण्याची गरज आहे. होळी पेटविण्याऐवजी होळीच्या दिवशी एका कुंडीत सार्वजनिक ठिकाणी वृक्ष ठेवून त्याचे पूजन करावे, यातून पर्यावरणाचा संदेश देणे सोपे जाईल. यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. खुशी बहुउद्देशीय फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश राऊत म्हणाले, होळीच्या नावाखाली चाललेली झाडांची कत्तल वेळीच थांबायला हवी, वृक्ष संवर्धन हेच ग्लोबल वॉर्निंगला प्रभावी उत्तर असल्याचे त्यांनी सांगितले. 

धूलिवंदन साधेपणाने साजरे करा - वसंत जाधव

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव बघता सर्वांनी धूलिवंधन हा सण अगदी साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी केले आहे. नागरिकांनी सण, उत्सव शांततेत साजरे करावे, जातीय सलोखा टिकवून ठेवावा, रंगाचे दुष्परिणाम आणि कोरोनाचा प्रादुर्भाव याची जाण ठेवून मोठ्यांनी आपल्या मुलांना घराबाहेर पडू देऊ नये, एवढेच नाही तर तरुणांनी मद्य प्राशन करून वाहन चालवू नये, अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी, असा अनुचित प्रकार करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल. आपल्या परिसरात असे घडत असल्यास तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी केले आहे.

कोरोना संसर्ग वाढत असल्याने होळी, धुळवड नागरिकांनी अगदी साधेपणाने साजरी करावी. प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, होळीत गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे हा सण अतिशय साधेपणात साजरा करा.-संदीप कदम, जिल्हाधिकारी भंडारा.

 

टॅग्स :Holiहोळी