जात पडताळणी कार्यालय २१ पासून सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2016 00:41 IST2016-11-18T00:41:43+5:302016-11-18T00:41:43+5:30

विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र. १ नागपूर विभाग नागपूर नवीन प्रशासकीय इमारत क्र.२, ५ वा माळा, सिव्हील लाईन,

The caste verification office will start from 21 | जात पडताळणी कार्यालय २१ पासून सुरू होणार

जात पडताळणी कार्यालय २१ पासून सुरू होणार

जिल्ह्यातच जात पडताळणी : नागरिकांसाठी सुलभ सोय
भंडारा : विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र. १ नागपूर विभाग नागपूर नवीन प्रशासकीय इमारत क्र.२, ५ वा माळा, सिव्हील लाईन, नागपूर या समितीच्या कार्यक्षेत्रांतर्गत भंडारा, गोंदिया व वर्धा जिल्ह्यातील शैक्षणिक, सेवाविषयक व निवडणूक विषयक जात प्रमाणपत्र पडताळणीचे कामकाज या कार्यालयातून नियमितपणे सुरु होते.
शासन आदेश ११ नोव्हेंबर अन्वये जिल्हानिहाय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या २१ नोव्हेंबर पासून जिल्हास्तरावर कार्यान्वित करण्यास शासन मान्यता देण्यात आल्यामूळे भंडारा, गोंदिया व वर्धा या जिल्ह्यातील शैक्षणिक व सेवाविषयक अर्ज या कार्यालयास १८ नोव्हेंबर पासून स्विकारणे बंद आहे.
भंडारा, गोंदिया व वर्धा येथील सामाजिक न्याय भवन येथे नव्याने सुरु होणाऱ्या कार्यालयात अर्ज २१ नोव्हेंबर पासून सादर करावे.
तसेच यापूर्वी सादर केलेल्या जात पडताळणी अर्जात काही आक्षेप असल्यास त्यांनी अर्जदाराचे जात प्रमाणपत्र ज्या जिल्ह्याचे आहे, त्या जिल्ह्यातील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती भंडारा, गोंदिया व वर्धा येथे नव्याने सुरु झालेल्या कार्यालयास आक्षेपाची पुर्तता करण्यास्तव अथवा पुढील कार्यवाही संदर्भात संपर्क साधावा.मात्र निवडणूक विषयक अर्जदारांचे अर्ज या कार्यालयात २१ नोव्हेंबर पर्यंत स्विकारण्यात येतील. होणाऱ्या बदलाची अर्जदारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन समितीचे उपायुक्त तथा सदस्य सुरेंद्र पवार यांनी केले आहे. (नगर प्रतिनिधी )

Web Title: The caste verification office will start from 21

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.