रेती चोरांवर वरठी ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:32 IST2021-01-22T04:32:13+5:302021-01-22T04:32:13+5:30
रेतीची चोरटी वाहतूक होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. बुधवारी सकाळी कोथुर्ना-बेटाळा-दाभा या रस्त्याने आयएएस महिला अधिकारी मीनल ...

रेती चोरांवर वरठी ठाण्यात गुन्हा दाखल
रेतीची चोरटी वाहतूक होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. बुधवारी सकाळी कोथुर्ना-बेटाळा-दाभा या रस्त्याने आयएएस महिला अधिकारी मीनल करनवाल शासकीय वाहनाने जात होत्या. रस्त्याने रेती भरलेले वाहन जात असल्याचे त्यांनी बघितले. त्यांनी आपल्या चालकाला गाडी थांबवायला सांगितले. त्या गाडीतून उतरल्या. एका ट्रॅक्टरच्या समोर होऊन ते रेती भरलेले वाहन थांबवले. त्या ट्रॅक्टरची चाबी काढून आपल्या ताब्यात घेतली. काही क्षणात रेती तस्करांचा घोळका घटनास्थळावर जमा झाला. त्या रेती तस्करांनी करनवाल यांना घेराव घातला. तसेच त्यांना धक्काबुक्की केली. या प्रकरणी बुधवारी रात्री शासकीय वाहनचालक विश्वास मिश्रा यांच्या तक्रारीवरून आरोपी चालक व मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राजेश थोरात करीत आहेत. रेती चोरणाऱ्या वाहनचालकाने मालकाच्या सांगण्यावरून सुमारे ५ ब्रास रेती किमत ५२ हजार रुपये चोरल्याचे पुढे आले आहे.