बिघडणाऱ्या उपकरणांसाठी 'डॉक्टर' मिळेनात...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:35 IST2021-04-24T04:35:53+5:302021-04-24T04:35:53+5:30
दयाल भोवते लाखांदूर : सर्वत्रच कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, अशातच काही कार्यालयांचे कामकाज व ...

बिघडणाऱ्या उपकरणांसाठी 'डॉक्टर' मिळेनात...!
दयाल भोवते
लाखांदूर : सर्वत्रच कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, अशातच काही कार्यालयांचे कामकाज व विद्यार्थ्यांचे शिक्षण तंत्रज्ञानाच्या मदतीने घरातूनच ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे तसेच ऊन्हाळा सुरू असल्यानेन पंखे, कुलर, फ्रीज, टीव्ही व तत्सम इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, सर्वत्रच लॉकडाऊन असल्याने इलेक्ट्रॉनिक्स व सेवा दुकाने बंद असल्याने बिघडणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी ‘डॉक्टर’ मिळेनात...! अशी स्थिती असून सर्वत्रच दुरूस्तीचा पेच निर्माण झाले आहे.
सर्वत्रच कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असताना राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊन अंतर्गत ‘अत्यावश्यक सेवे’शिवाय इतर दुकाने व आस्थापने बंद करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले.
सदर आदेशानुसार तालुक्यातील सर्वत्रच ‘अत्यावश्यक दुकाने’ शासन निर्देशित विहीत वेळेत सुरू. इतर दुकाने व आस्थापने बंद असल्याची माहिती आहे.
सध्या ऊन्हाळा सुरू असल्याने बहुतेकांच्या घरी पंखे, कुलर, फ्रीज, टीव्ही व तत्सम इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. शेतशिवारात ऊन्हाळी धान पिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी इलेक्ट्रीकल मोटारचा वापर सुरू आहे. काही कार्यालयांचा कारभार ऑनलाईन पद्धतीने तर विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यासदेखील सुरू असल्याची माहिती आहे.
अशातच सदर इलेक्ट्रॉनिक ऊपकरणांचा वापर अधिक होत असून त्यांच्यात बिघाडाचे व बंद होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे मात्र शासननिर्देशानुसार सध्या इलेक्ट्रॉनिक्सची दुकानेे, सेवा केंद्र बंद असल्याने ही उपकरणे दुरुस्त होणे कठीण बनले आहे. प्रसंगी तालुक्यात सर्वत्रच दुरुस्तीचा पेच निर्माण झाला असून ऑनलाईन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी व सामान्य जनतेत रोष व्यक्त केला जात आहे.
बॉक्स :
ऑनलाईन पर्यायही बंद
तालुक्यातील काही नागरिक इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी ई-कॉमर्सचा मार्ग स्वीकारतात. मात्र, तिथे देखील अत्यावश्यक वस्तूंच्या विक्रीला परवानगी असल्याने नवीन उपकरणे खरेदीचे सर्व मार्ग बंद झाले आहेत.