रेतीचे नियमबाह्य लिलाव रद्द करा

By Admin | Updated: February 12, 2016 01:25 IST2016-02-12T01:25:01+5:302016-02-12T01:25:01+5:30

मोहाडी तालुक्यातील ढिवरवाडा रेतीघाट येथून रेतीचे लिलाव नियमबाह्य झाले आहे. त्यामुळे ते लिलाव रद्द करण्यात यावे, अशी मागणी

Cancel the rule out of the sand | रेतीचे नियमबाह्य लिलाव रद्द करा

रेतीचे नियमबाह्य लिलाव रद्द करा

भंडारा : मोहाडी तालुक्यातील ढिवरवाडा रेतीघाट येथून रेतीचे लिलाव नियमबाह्य झाले आहे. त्यामुळे ते लिलाव रद्द करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शहजादाभाई यांनी आयोजित पत्रपरिषदेत केली.
यावेळी ते म्हणाले, ढिवरवाडा रेतीघाट येथून चोरटी वाहतुकीमुळे जप्त करण्यात आलेल्या रेतीचे रितसर लिलाव ५ जानेवारी रोजी करण्यात आले. त्यात उच्चबोली करणारे सरपंच नरेश ईश्वरकर यांना बोली झाली. लिलाव रक्कममधून १२ टक्के रक्कम लिलावात जमा करण्यात आली. परंतु अधिकाऱ्यांनी शिल्लक रक्कम जमा करण्यासाठी नियमानुसार पुरेसा वेळ दिला नाही. ते लिलाव रद्द करण्यात आले. बोली लावणाऱ्यांना कुठलिही सूचना न देता ताबडतोब डंपींग रेतीचे दुसऱ्यांदा लिलाव काढण्यात आले. यात अधिकाऱ्यांनी संगणमत करून ९ लाख सात हजार रूपयात बोली दिली. प्रथम लिलावामध्ये प्रथम बोली २० लाख रूपये आणि दुसऱ्या बोलीमध्ये १९ लाख ५० हजार रूपयांमध्ये होती. नियमानुसार दुसरी बोली लावणाऱ्याला प्राधान्य न देता किंवा बोली लावणारी जाहिरात न देता अधिकाऱ्यांनी शासनाचा १० लाखांचा महसूल बुडविला आहे.
८ फेब्रुवारी रोजी पुनरलिलाव करण्यात आला. तो लिलाव अवैध ठरवून रद्द करण्यात यावे, एसडीओ, तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यावर चौकशी नेमूण कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहजादाभाई यांनी करुन गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी रेती उचल करण्यावर स्थगिती देण्यात येत असल्याचे आश्वासन दिले. यावेळी मकसूद पटेल, रामू माथनीकर, बालू बोंदरे, इब्राहम शेख उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी )

Web Title: Cancel the rule out of the sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.