शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या सावटातही मोकळ्या जागेत धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:39 IST

पालांदूर : पावसाचे सावट असूनही जोखीम पत्करत खुल्या जागेत धानमोजणी सुरू करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांचा वाढता आक्रोश पाहता ...

पालांदूर : पावसाचे सावट असूनही जोखीम पत्करत खुल्या जागेत धानमोजणी सुरू करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांचा वाढता आक्रोश पाहता मेंगापूर धान खरेदी सुरू करण्यात आलेली आहे.

पालांदूर परिसरात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून धान खरेदी सुरू करण्यात आली. गोदामाच्या क्षमतेपेक्षा अधिक धान खरेदी करीत शेतकऱ्यांना न्याय देण्यात आला. भरडाई आदेश होऊन मालाची उचल होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, शासन व प्रशासनाच्या धोरणाने भरडाई आदेश मिलर्सधारकांनी स्वीकारलेले नाहीत. त्यामुळे धान खरेदी प्रभावित झालेली आहे. यात शेतकरी नाहक गोवला जात असून त्याच्या सहनशीलतेचा अंत शासन-प्रशासन पाहत आहे.

गत तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे धान मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. कित्येक शेतकऱ्यांच्या धान्याची नासाडीसुद्धा झालेली आहे. पोती फाटून धान मातीमोल झालेले आहेत. इतकी विदारक परिस्थिती लोकप्रतिनिधींना कळवूनही शासन व्यवस्था सुधारलेली नाही. आता धान खरेदी केंद्रधारकांनी जोखीम पत्करत खुल्या नभाखाली धान खरेदी शेतकऱ्यांच्या साक्षीने सुरू केलेली आहे. धान खरेदीचे पैसे शेतकऱ्यांना नियमित मिळत आहेत. परंतु, अर्ध्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांची धानमोजणी अजूनही शिल्लक आहे. ३१ मार्च ही धानमोजणी ची अंतिम तारीख ठरलेली आहे. अशा प्रसंगात शेतकऱ्यांचे धान मोजणे निश्चितच आवाक्याबाहेरचे दिसते. लोकप्रतिनिधी कर्तव्यात कसूर करीत असल्याने शेतकरी हतबल ठरलेला आहे.

गणराजबाबा सुशिक्षित बेरोजगार धान खरेदी केंद्र मेंगापुरांतर्गत २८ जानेवारीपर्यंत ८६१ शेतकऱ्यांच्या २५ हजार ५०८ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आलेली आहे. यातील ७६५ शेतकऱ्यांचे ४ कोटी २५ लाख ५३ हजार ७८७ रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांचे चुकारेसुद्धा लवकर येतील, अशी आशा आहे.

बॉक्स

हमीभावाने धान खरेदीला तीन महिने लोटल्यानंतरही शासनाने धानाच्या भरडाईचे दर अद्यापही निश्चित केलेले नसल्याने धान भरडाईचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. शासनाची स्वतःची गोदामव्यवस्था तोकडी असल्याने खाजगी गोदाम व्यवस्थेवर धान खरेदीची मदार आहे. शासनाने किमान शेतकरी हितार्थ तरी एक पाऊल मागे घेत धान भरडाई प्रश्नावर मिलर्सना सकारात्मकरीत्या सहकार्य करणे नितांत गरजेचे आहे. शेजारच्या छत्तीसगढ व मध्य प्रदेश शासनांच्या धर्तीवर महाराष्ट्रातील धान भरडाईचे नियोजन आखणी झाल्यास निश्चितच महाराष्ट्रातील भरडाईचा प्रश्न निकाली लागेल, यात शंका नाही!