अपघातात बसचा चेंदामेंदा

By Admin | Updated: June 18, 2014 23:54 IST2014-06-18T23:54:58+5:302014-06-18T23:54:58+5:30

मांगलीकडून खाप्याकडे जाणाऱ्या एका वृद्ध स्कूटर चालकाला भरधाव ट्रकने धडक दिली. अपघातानंतर ट्रक घेऊन पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रकने तुमसरहून गडचिरोलीकडे जाणाऱ्या बसला

Bus crash | अपघातात बसचा चेंदामेंदा

अपघातात बसचा चेंदामेंदा

खापा चौकातील घटना : चालक वाहकासह चार प्रवासी गंभीर जखमी
तुमसर : मांगलीकडून खाप्याकडे जाणाऱ्या एका वृद्ध स्कूटर चालकाला भरधाव ट्रकने धडक दिली. अपघातानंतर ट्रक घेऊन पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रकने तुमसरहून गडचिरोलीकडे जाणाऱ्या बसला आमोरासमोर ट्रक धडक दिली. या अपघातात स्कुटरचालक, एसटी चालक वाहकासह तीन प्रवाशी गंभीर जखमी झाले. एसटीच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला असून ही घटना सकाळी ८ च्या सुमारास खापा चौकात घडली.
इमरीत फुंडे (६३) रा.मांगली हे मांगलीकडून खाप्याकडे स्कूटरने जात होते. रामटेककडून गोंदियाकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक सीजी-०४/जे.ए.-३६४४ ने त्यांच्या स्कूटरला धडक दिली. अपघातानंतर ट्रकचालक पळून जात असतान या ट्रकने समोरून येणाऱ्या तुमसर-गडचिरोली एस.टी. क्रमांक एम.एच.४०/८५१६ ला जोरदार धडक दिली. यात एस.टी.च्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला. या विचित्र अपघातात एस.टी. चालक डालाराम कुंभरे (३७) रा.तुमसर, वाहक रमेश भलावी (३२) रा.तुमसर, सुरेश सेलोकर (५४) रा.तुमसर, सरस्वता कुलरकर (६२) रा.मोहाडी, तुळजा जगनाडे (६१) रा.नेरी हे प्रवाशी गंभीररित्या जखमी झाले.
जखमींना तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. तुमसर पोलिसांनी ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा नोंदविला असून तपास सुरू आहे. जखमी प्रवाशांना एस.टी. प्रशासनाने प्रत्येक एक हजाराची मदत दिली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Bus crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.