Buldhana: भरधाव ऑटो आणि एसटीची समोरासमोर धडक, शाळकरी मुलांसह सामान्य प्रवासी किरकोळ जखमी
By अनिल गवई | Updated: December 5, 2023 13:25 IST2023-12-05T13:24:50+5:302023-12-05T13:25:23+5:30
Buldhana News: भरधाव मालवाहू ऑटो आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात शाळकरीमुलांसह ५० प्रवासी किरकोळ जखमी झाले. तर दोन्ही चालक गंभीर जखमी झाले.

Buldhana: भरधाव ऑटो आणि एसटीची समोरासमोर धडक, शाळकरी मुलांसह सामान्य प्रवासी किरकोळ जखमी
- अनिल गवई
खामगाव - भरधाव मालवाहू ऑटो आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात शाळकरीमुलांसह ५० प्रवासी किरकोळ जखमी झाले. तर दोन्ही चालक गंभीर जखमी झाले. ही घटना खामगाव उदयनगर रस्त्यावरील पिंप्री कोरडे नजीक मंगळवारी सकाळी घडली.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, खामगाव आगाराची एमएच २० बीएल १८२२ क्रमांकाची बस लाखनवाडा येथून उदयनगरकडे जात होती. दरम्यान, पिंप्री कोरडे नजीक विरूध्द दिशेने भरधाव ऑटो आणि एसटीची समोरासमोर धडक झाली. ऑटोच्या धडकेमुळे अनियंत्रित झालेली बस रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन आदळली. यात बसमधील २० ते २२ विद्यार्थी आणि काही सामान्य प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर प्रत्यक्षदर्शी आणि नागरिकांनी विद्यार्थी आणि प्रवासांना सुखरूप बाहेर काढले. त्याचवेळी एसटी आणि ऑटोतील चालकासह तीघे गंभीर जखमी झाल्याचे समजते. ऑटोचे गेट उघडे असल्याने हा अपघात झाल्याची चर्चा घटनास्थळी होती. याप्रकरणी दुपारी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्याची प्रक्रीया सुरू होती.