लाखनीत पक्ष्यांसाठी घरटे बांधणी

By Admin | Updated: June 23, 2014 23:42 IST2014-06-23T23:42:59+5:302014-06-23T23:42:59+5:30

शहरात ग्रीनफ्रेंडस् नेचर क्लब तर्फे पक्षांसाठी घरटे बांधणी उपक्रम नेचर क्लब सदस्यांद्वारा राबविला गेला. पावसाळा ऋतू आला की पक्ष्यांना वेध लागतात घरटे बांधणीचे.

Build nest for lacquer birds | लाखनीत पक्ष्यांसाठी घरटे बांधणी

लाखनीत पक्ष्यांसाठी घरटे बांधणी

लाखनी : शहरात ग्रीनफ्रेंडस् नेचर क्लब तर्फे पक्षांसाठी घरटे बांधणी उपक्रम नेचर क्लब सदस्यांद्वारा राबविला गेला.
पावसाळा ऋतू आला की पक्ष्यांना वेध लागतात घरटे बांधणीचे. याद्वारे येणाऱ्या नवीन पिढीचे संरक्षण व संवर्धन करीत असतात. बहुतेक पक्ष्यांचा विणीचा हंगाम पावसाळ्याची चाहूल लागली की सुरु होत असतो व पक्ष्यांची लगबग सुरु होते छोटेसे घरकुल बनविण्याची. शहरात मध्यम गावात अधिवास करणाऱ्या पक्ष्यांना मानवाच्या आधुनिक जीवनशैली व आधुनिक घररचनेमुळे पूर्वीसारखे घरटे बांधणी करणे कठीण जात आहे. पूर्वीच्या घरांमध्ये टांगलेले काचफ्रेम केलेले फोटो, वासे, कौलारू छप्पर, अंगणात, परसात वेलीयुक्त असलेला मांडव, मातीचे घरे, गाई बकरे, कोंबडे यांचे गोठे, कोांडे असायचे. आजच्या आधुनिक सिमेंट स्लॅबच्या घरामुळे व आधुनिक फॅशनेबल विचारसरणीमुळे शहरात मध्यम गावात राहणारे चिमण्या, कावळे, मैना, कवडी, दयाळ, शिंजीरी, शिंपी, सुतार, बुलबुल, मुनिया, वेडा राघू, भिंगरी, पाकोळी, पोपट, घुबड इत्यादी पक्ष्यांच्या विविध प्रजातींना तसेच वटवाघळांच्या विविध प्रजातींना यांना घरात व घराच्या परिसरात अधिवास करणम्यास कठीण जात आहे. त्यामुळेच पक्षांच्या संख्येवर विपरीत परिणाम होते. यावेळी प्रा.अशोक गायधने यांनी पक्ष्यांसाठी कृत्रीम घरटे का बनवावे, याची आवश्यकता प्रतिपादीत केली व प्रत्येक नागरिकाने आपल्या घरी कृत्रीम घरटे टांगावे असे आवाहन केले.
यावेळी लाकडी कृत्रीम घरटे बांधणीबद्दल मार्गदर्शन नितीन पटले, सर्पमित्र पंकज भिवगडे यांनी केले. खर्डे, खोक्यापासून घरटे बांधणीबद्दल आकाश मुळे व कार्तीक वंजारी यांनी मार्गदर्शन केले. मातीपासून घरटे बांधणीबद्दल प्रा.अशोक गायधने व पदाधिकारी दिनकर कालेजवार यांनी मार्गदर्शन केले.
संचालन अशोक वैद्य, योगेश वंजारी व सहाय्य नितीन पटले, मयूर गायधने यांनी केले. यावेळी बनविलेले लाकडी व खर्डा घरटे नितीन पटले, कार्तीक वंजारी, आकाश मुळे, मुकुल खवसकर, रितीक भुले, विवेक कापगते, कुणाल नन्नावरे, तेजस हनवतकर, खेमचंद वडेकर, मोहीत पाखमोडे आदींना वितरीत करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Build nest for lacquer birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.