बौद्ध धम्म हा आचरणाचा धम्म

By Admin | Updated: March 11, 2015 00:46 IST2015-03-11T00:46:11+5:302015-03-11T00:46:11+5:30

बौद्ध धम्म हा आचरणाचा धम्म आहे. यामुळे प्रत्येक व्यक्ती प्रकाशमान होतो, स्वत:चा मार्ग शोधतो. त्यामुळे स्वत:ची दिशा गवसायला लागली.

Buddhist dhma | बौद्ध धम्म हा आचरणाचा धम्म

बौद्ध धम्म हा आचरणाचा धम्म

साकोली : बौद्ध धम्म हा आचरणाचा धम्म आहे. यामुळे प्रत्येक व्यक्ती प्रकाशमान होतो, स्वत:चा मार्ग शोधतो. त्यामुळे स्वत:ची दिशा गवसायला लागली. देशातील समाज चिखलात, अंधारात पडलेला होता परंतु भगवान गौतम बुद्धामुळे व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपले जीवन अंधाराकडून प्रकाशाकडे जायला लागला, माणूस स्वाभिमानी बनत चालला. भंते प्रज्ञाज्योतींनी या स्थळावरून बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला. त्यामुळे हा परिसर बौद्ध स्थळ म्हणून नावारूपास येत आहे. त्यामुळे धम्म आणि धर्मातील फरक कळायला लागला, असे मत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. आलेबेदर येथील दोन दिवशीय बौद्ध धम्म परिषदेत उद्घाटनीय भाषणात ते बोलत होते.
याप्रसंगी आमदार बाळा काशिवार, डी.जी. रंगारी, समता सैनिक दलाचे बोधानंद गुरूजी, भदंत कृपाशरण महास्थवीर, भदंत महाथेरे, भदंत सुगत, भदंत ज्ञानज्योती, भदंत बुद्धघोष, भदंत नागदिपकर, भिक्खुणी धम्मदिना, भिक्खुणी संघप्रिया, भिक्खुणी चित्ताबोधी, भंते नंद, भंते धम्मज्योती, संघज्योती इतर मंचावर बहुसंख्य भिक्खु उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार बाळा काशिवार, डी.जी. रंगारी, समता सैनिक दलाचे बोधानंद गुरूजी व मान्यवर भंते यांची भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सांगून बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार कसा करता येईल व त्यांचे विचार कसे रूजविता येतील यावर विचार व्यक्त केले.
प्रबोधनात्मक बुद्ध भिमगीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये गायक अनिरूद्ध शेवाडे, मनोज कोटांगले, सुभाष कोठारे, संविधान भारती, विकास भारती, सुनिता सरगम, स्रेहा ताकसांडे यांनी गीतातून प्रबोधन केले.
तसेच दोन दिवस धम्मकुटी आलेबेदर येथे रोगनिदान व रक्तदान शिबिराचे आयोजन खांबा उपकेंद्रातर्फे करण्यात आले. त्यामध्ये डॉ. जे.डब्ल्यु. सुखदेवे यांनी मेहनत घेवून सर्वच उपासकांनी मोफत औषधाचा लाभ घेतला. समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी.एफ. कोचे, एम.आर. राऊत, गजेंद्र गजभिये, बोधानंद यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमासाठी भंते नंद, भंते, धम्मज्योती, संघ ज्योती, जीवनज्योती, भिक्खु नागसेन, भिक्खु आनंद, भिक्खु विनय ज्योती, भिक्खु अनिरूद्ध, दिपक मेश्राम, प्रा. राहुल बागडे, कौसल्या नंदेश्वर आदींनी सहकार्य केले.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Buddhist dhma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.