उमरी-महालगाव मार्गावर होणार पूल
By Admin | Updated: March 1, 2017 00:35 IST2017-03-01T00:35:31+5:302017-03-01T00:35:31+5:30
तालुक्यातील उमरी ते महालगाव या मार्गावरील चुलबंद नदीवर पुल व्हावा, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.

उमरी-महालगाव मार्गावर होणार पूल
बाळा काशीवार : साकोली विधानसभा क्षेत्रात विकासकामांचे भूमिपूजन
साकोली : तालुक्यातील उमरी ते महालगाव या मार्गावरील चुलबंद नदीवर पुल व्हावा, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. या पुलाच्या बांधकामासाठी ३५ कोटी रूपयांचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच या पुलाचे बांधकाम सुरू होणार असल्याचे प्रतिपादन आमदार बाळा काशीवार यांनी केले.
साकोली मतदार संघातील विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी उमरी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विधानसभा क्षेत्रातील साकोली, लाखनी व लाखांदूर या तिनही तालुक्यामध्ये विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी, जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते, पंचायत समिती सदस्य जयश्री पर्वते, उपसभापती लखन बर्वे, तालुका अध्यक्ष रमेश खेडीकर, नंदू हर्षे, बंडू बोरकर, नीळकंठ उपरीकर, प्रल्हाद शेंडे, राधेश्याम मुंगमोडे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)