शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

लाचखोर लिपीक व शिपाई ‘एसीबी’च्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 11:47 PM

गोसीखुर्द प्रकल्पासाठी संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपीक आणि शिपायाला बुधवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाºयांनी रंगेहात पकडले.

ठळक मुद्दे४० हजारांची मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ट्रॅप’, भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी लाचेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोसीखुर्द प्रकल्पासाठी संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपीक आणि शिपायाला बुधवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाºयांनी रंगेहात पकडले. सलग दुसºया दिवशी ही एसीबीची कारवाई झाल्याने लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.कनिष्ठ लिपीक चंद्रेश प्रकाश काटेखाये (३०), शिपाई योगेश दसारामजी भोंगाडे (२८) अशी लाचखोरांची नावे आहेत. चंद्रेश काटेखाये जिल्हाधिकारी कार्यालयातील गोसीखुर्द विशेष पॅकेज क्रमांक तीन मध्ये लिपीक म्हणून कार्यरत आहेत. तर योगेश हा गोसीखुर्द उपजिल्हाधिकारी कार्यालयात कंत्राटी शिपाई म्हणून कार्यरत आहे.गोसीखुर्द प्रकल्पात सुरेवाडा (जुना) येथील गावठाण संपादित करण्यात आले. संबंधित तक्रारकर्त्याला शासनाने २ लाख ९० हजार रुपये अनुदान मंजूर केले. त्याकरिता लागणाºया सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. त्यानंतर प्रकरण मंजूर होऊन बँक आॅफ बडौदाच्या शाखेत सदर रक्कम जमा झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपीक चंद्रेश काटेखाये याने खात्यात जमा झालेल्या रकमेचा मोबदला म्हणून ४० हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम न दिल्यास बँकेला व तलाठ्याला पत्र देवून खाते बंद करण्याची धमकी दिली. यामुळे संबंधित तक्रारदार हतबल झाला. अखेर भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. त्यावरून १७ जुलै रोजी पडताळणी दरम्यान ४० हजार रुपयांची लाच मागीतल्याचे स्पष्ट झाले.दरम्यान बुधवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा रचण्यात आला. त्यावेळी संबंधित तक्रारकर्त्याकडून ४० हजार रुपयांची लाच घेताना काटेखाये व भोंगाडे यांना रंगेहात अटक करण्यात आली. या दोघांविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक प्रतापराव भोसले करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, पोलीस उपअधीक्षक दिनकर सावरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी, प्रतापराव भोसले, गणेश पडवार, संजय कुरंजेकर, नितीन शिवणकर, गौतम राऊत, रविंद्र गभणे, सचिन हलमारे, शेखर देशकर, अश्विनकुमार गोस्वामी, पराग राऊत, कोमलचंद बनकर, दिनेश धार्मिक आदींनी केली. लाचखोर अधिकारी आणि कर्मचाºयांमध्ये या धाडीमुळे धास्ती निर्माण झाली आहे.दुसऱ्या दिवशीही कारवाईभंडारा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने मंगळवारी स्वस्त धान्य दुकानदाराला २ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. या वृत्ताची शाई वाळत नाही तोच बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लिपीक आणि शिपायाला रंगेहात पकडण्यात आले. सलग दुसºया दिवशीही एसीबीचा ट्रॅप झाल्याने लाचखोरांचे धाबे दणाणले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात या ट्रॅपची दिवसभर दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.