बीपीएलधारकांना १० रूपयात वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 23:04 IST2017-12-16T23:03:35+5:302017-12-16T23:04:05+5:30
बीपीएलधारकांना केवळ १० रूपयात तर सौभाग्य योजनेंतर्गत एपीएलधारकांना ५०० रूपये भरून विद्युत मिटर मिळणार आहे. यामुळे अनेक वंचितांची घरे प्रकाशमान होणार आहेत.

बीपीएलधारकांना १० रूपयात वीज
आॅनलाईन लोकमत
पालांदूर : बीपीएलधारकांना केवळ १० रूपयात तर सौभाग्य योजनेंतर्गत एपीएलधारकांना ५०० रूपये भरून विद्युत मिटर मिळणार आहे. यामुळे अनेक वंचितांची घरे प्रकाशमान होणार आहेत.
महावितरण कंपनीच्या योजनांची माहिती देण्यासाठी वीज अधिकारी, सरपंच, सचिवांची एक सभा पार पडली. यात अभियंता पंकज आखाडे यांनी माहिती दिली. पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत वीज जोडणीची व्याप्ती प्रत्येक घरात वीज पोहचविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. वर्षभरातील विविध योजनांची माहिती देताना अभियंता पंकज आखाडे म्हणाले, गरजूंना वीज देण्यात आम्ही कटीबद्ध आहोत. सुरक्षित वीज प्रत्येक घरात शेतात पोहचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत शेतकºयांनी सहभाग नोंदवित योजनेचा लाभ घ्यावयाचा घरात आज वीज नसल्यास फक्त १० रूपयात दारिद्रयरेषेमार्फत कुटुंबाला तर एपीएलधारकाला फक्त ५०० रूपये वीज जोडणी शक्य आहे. गावात कमी दाबाचा प्रश्न, विजेची अनियमितता किंवा आणखी काही विजेच्या समस्या असल्यास प्रत्यक्ष किंवा फोनद्वारे कळवून सेवा प्राप्त करून घेण्याचे आवाहन केले. या बैठकीला पालांदूरचे सरपंच जितेंद्र कुरेकार, हेमराज कापसे, किसन बडोले, देवकण बेंदवार, संगिता घोनमोडे, वैशाली बुरडे, तुळशीराम फुंडे, टिकाराम तरारे आदी उपस्थित होते. आभार तंत्रज्ञ हिरामन बारई यांनी केले.