वन कर्मचाऱ्यांचा तांत्रिक कामांवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 10:10 PM2017-11-26T22:10:01+5:302017-11-26T22:11:10+5:30

मागील ३० वर्षांपासून वनकर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्या सोडविण्यासाठी आडकाठी आणल्या जात असल्याने त्यांच्या समस्या पूर्ण होईपर्यंत तांत्रिक कामावर बहिष्कार....

Boycott of forest workers' technical work | वन कर्मचाऱ्यांचा तांत्रिक कामांवर बहिष्कार

वन कर्मचाऱ्यांचा तांत्रिक कामांवर बहिष्कार

Next
ठळक मुद्देविविध समस्या प्रलंबित : वनरक्षक, वनपाल कर्मचाऱ्यांनी घेतला सभेत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मागील ३० वर्षांपासून वनकर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्या सोडविण्यासाठी आडकाठी आणल्या जात असल्याने त्यांच्या समस्या पूर्ण होईपर्यंत तांत्रिक कामावर बहिष्कार घालण्याचा निर्णय वनरक्षक, वनपाल कर्मचाऱ्यांनी रविवारी पार पडलेल्या सभेत घेतला.
महाराष्ट्र राज्य वनरक्षक, वनपाल संघटनेचे अध्यक्ष विजय मेहर, वनरक्षक पदोन्नत वनपाल संघटनेचे केंद्रीय संघटक ललीतकुमार उचिबगले यांच्या मार्गदर्शनात ही सभा पार पडली. या सभेत जिल्ह्यातील शेकडो वनकर्मचारी उपस्थित होते. वनरक्षक, वनपाल ही तांत्रिक कामे यात जीपीएस हाताळणे, उपचार नकाशा काढणे, रोपवन नकाशे काढणे, बेसलाईन तयार करणे, पीडीएवर वनगुन्हे अपलोड करणे, बिनगुन्ह्यांची नोंद पीडीए द्वारे शासनाला सादर करणे, आठ तासाची सेवा असताना २४ तासाची सेवा बजावणे, मोबदल्यामध्ये वनरक्षकांची जुनी वेतनश्रेणी १८०० वरून २४०० रुपयावर करणे तर वनपालाची २४०० वरुन ४२०० करणे आदी मागण्या असताना त्या अपूर्ण आहेत, त्यामुळे मागील ३० वर्षापासून याबाबत शासनासोबत लढा सुरु आहे. याची दखल न घेतल्याने वनकर्मचाºयांनी तांत्रिक कामे करणाºयांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय सभेत घेतला.
यावेळी भंडारा वनविभागातील वनरक्षक, वनपाल, संघटनेचे टी.एच. घुले, पप्पू सय्यद, डी.जी. कुशवाह यांच्यासह जिल्ह्यातील वनकर्मचारी उपस्थित होते.
या आहेत समस्या
वनकर्मचाऱ्यांना मिळणारे टीआरए चुकीने कपात केली जाते, वनपरिक्षेत्र नाकाडोंगरी, भंडारा, जांब कांद्री हे वनकर्मचाऱ्यांना वारंवार त्रास देऊन चुकीची कामे करून घेत असल्याचा आरोप कर्मचाºयांनी लावला आहे. पेट्रोलिंग वाहन वनकर्मचाऱ्यांना पेट्रोलिंगला न देता वनपरिक्षेत्राधिकारी स्वत:च्या कामासाठी वापरित असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. चुकीचे बिल तयार करून निधीत अफरातफर केली आहे. वनपरिक्षेत्र जांब कांद्री हे कर्मचाऱ्यांना त्रास देत असल्याची तक्रार या सभेत करण्यात आली.

Web Title: Boycott of forest workers' technical work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल