सुरक्षाकर्मीच्या सतर्कतेने मुलगा मिळाला
By Admin | Updated: January 12, 2016 00:37 IST2016-01-12T00:37:12+5:302016-01-12T00:37:12+5:30
तुमसर रोड रेल्वे सुरक्षा दलाच्या समयसूचकतेमुळे १० वर्षीय मुलगा सुखरुप आईवडिलांना पाचारण करुन त्यांच्या स्वाधीन करण्यात यश आले.

सुरक्षाकर्मीच्या सतर्कतेने मुलगा मिळाला
तुमसर रोड येथील घटना : आईवडिलांचे स्वाधीन केले.
तुमसर : तुमसर रोड रेल्वे सुरक्षा दलाच्या समयसूचकतेमुळे १० वर्षीय मुलगा सुखरुप आईवडिलांना पाचारण करुन त्यांच्या स्वाधीन करण्यात यश आले. अस्मीत रामबाबु यादव रा. नागपूर असे मुलाचे नाव आहे.
अस्मीत यादव हा खात येथे मावशीकडे राहत होता. अभ्यासाचा भीतीमुळे तो ७ जानेवारीला घरुन पळून गेला. याबाबत घरच्यांनी इतवारी येथे तक्रार दाखल केली होती. नातेवाईक व पोलिसांची शोधाशोध सुरु होती. सर्वच रेल्वे स्थानकावर या घटनेची माहिती देण्यात आली. तुमसर रोड रेल्वे स्थानकावर एक मुलगा एकटाच फिरताना रेल्वे सुरक्षा दलाचे जवान अमर ढबाले यांना दिसला. त्यांनी त्याची आस्थेने चौकशी करुन रेल्वे सुरक्षा दल कार्यालयात आणले. कार्यालयात अमर ढबाले, एन .एन. झोडे, आर. के. यादव, श्याम बिहारी, वाय. एच. वैद्य, इशांत दीक्षित, दुबे, रेल्वे समिती सदस्य आलमखान यांनी त्यांची चौकशी व विचारणा केली. मुलाने नागपूर येथे आईवडील राहतात व मी खात येथे मावशीकडे राहतो हे सांगून घर का सोडल्याची माहिती दिली. तुमसर रोड रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ हिंगणा रोड नागपूर येथील पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी अस्मीतच्या आई-वडिलांना मुलाची माहिती दिली. ते तुमसर रोड येथे रेल्वे कार्यालयात पोहोचले व मुलाला घेऊन गेले. (तालुका प्रतिनिधी)