दोघांचा मृत्यू, २८५ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:37 IST2021-03-27T04:37:21+5:302021-03-27T04:37:21+5:30
भंडारा तालुक्यात कोरोना मृत्यूदर अत्यल्प आहे. मात्र गत आठ दिवसांत कोरोना मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी भंडारा ...

दोघांचा मृत्यू, २८५ पॉझिटिव्ह
भंडारा तालुक्यात कोरोना मृत्यूदर अत्यल्प आहे. मात्र गत आठ दिवसांत कोरोना मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी भंडारा तालुक्यातील ६० वर्षीय पुरुषाचा रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला, तर पवनी तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुषाचा कोरोनाने घरीच मृत्यू झाला. एकीकडे रुग्ण संख्या वाढत असताना नागरिक मात्र कोरोना नियमांचे पालन करताना दिसत नाही.
बॉक्स
ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १६६४
भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १६६४वर जाऊन पोहोचली. त्यात सर्वाधिक भंडारा तालुक्यातील ७५१, मोहाडी ९६, तुमसर २०९, पवनी ३३४, लाखनी १५७, साकोली १०६, लाखांदूर २१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील काही रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर काही होम क्वारंटाइन आहेत. जिल्हा प्रशासनाने कोरोना चाचणी वाढविली असून, ठिकठिकाणी शिबिर घेतले जात आहे. नागरिकांनी ताप, सर्दी, घोकला, अंगदुखी, घशात खवखव अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधून कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.