संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह

By Admin | Updated: September 9, 2015 00:41 IST2015-09-09T00:41:27+5:302015-09-09T00:41:27+5:30

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिकाम्या सदनिकेमध्ये रवी श्रीराम मुकुरने (४२) या इसमाचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

The bodies found in suspicious condition | संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह

संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह

दिघोरी (मोठी) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिकाम्या सदनिकेमध्ये रवी श्रीराम मुकुरने (४२) या इसमाचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मुकुरने यांचा मृत्यू घातपात असल्याची गावात चर्चा आहे.
दिघोरी (मोठी) प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका सविता मुकुरने यांचे ते पती होत. सोमवारला सायंकाळच्या सुमारास सविता मुकुरने यांची आई रिकाम्या सदनिकेत जळावू लाकडे आणण्यासाठी गेल्या असता त्यांना रवी मुकुरने यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. त्यानंतर त्यांनी आरडाओरड करताच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी व परिसरातील नागरिक धावून गेले. या घटनेची माहिती दिघोरी पोलीस ठाण्यात देण्यात आली. माहिती मिळताच ठाणेदार बी.जे. यादव व यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लाखांदूर येथे पाठविण्यात आला. गळफास घेतलेल्या स्थितीतील मृतदेहावर व खाली रक्ताचे डाग होते. जीभ बाहेर निघालेली नव्हती. त्यामुळे ही आत्महत्या नसून खून असावा अशी चर्चा होती. अंत्यविधीसाठी मृतदेह चिचाळ या मूळगावी नेण्यात आले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, वडील, भाऊ असा आप्त परिवार आहे. याप्रकरणी दिघोरी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. (वार्ताहर)

Web Title: The bodies found in suspicious condition