‘लोकमत’ची रक्तदान चळवळ प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 05:00 IST2021-07-18T05:00:00+5:302021-07-18T05:00:37+5:30

रक्तदानाने रक्त कमी होत नसून शरीरात नव्या रक्ताची निर्मिती होते. ४६ वर्षांच्या आयुष्यात आपण ४६ वेळा रक्तदान केल्याचे सांगत त्यांनी रक्तदानासाठी तरुणांना प्रोत्साहित केले. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लाखांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या सभागृहात आयोजित रक्तदान महायज्ञ शिबिरात ते बोलत होते.

The blood donation movement of ‘Lokmat’ is inspiring | ‘लोकमत’ची रक्तदान चळवळ प्रेरणादायी

‘लोकमत’ची रक्तदान चळवळ प्रेरणादायी

ठळक मुद्देमनोहर कोरेट्टी : लाखांदूर येथे रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

लाेकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : कोरोना संकट काळात  सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून अशा संकटात ‘लोकमत’ने सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान महायज्ञाची चळवळ सुरू केली. ही रक्तदान चळवळ सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन लाखांदूरचे ठाणेदार मनोहर कोरेट्टी यांनी केले. रक्तदानाने रक्त कमी होत नसून शरीरात नव्या रक्ताची निर्मिती होते. ४६ वर्षांच्या आयुष्यात आपण ४६ वेळा रक्तदान केल्याचे सांगत त्यांनी रक्तदानासाठी तरुणांना प्रोत्साहित केले.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लाखांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या सभागृहात आयोजित रक्तदान महायज्ञ शिबिरात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे नायब तहसीलदार देवीदास पाथोडे, ठाणेदार मनोहर कोरेट्टी, ठाणेदार नीलेश गावंडे, वनपरीक्षेत्रधिकारी रुपेश गावीत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विरसेन चहांदे, संदीप ताराम, अमोल कोकाटे, जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक रवी मेश्राम, माजी नगरसेवक बंटी सहजवाणी, माजी नगरसेवक नीलिमा टेंभुर्णे, कॉंग्रेसचे मनोज बंसोड, उत्तम भागडकर, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष धनराज हटवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बालू चुन्ने, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष ॲड. मोहन राऊत, चंद्रशेखर टेंभुर्णे, खेमराज भुते, गिरीधर नागेश्वर, तालुका युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, भोजराज कडीखाये, मुख्याध्यापक गोरखनाथ वंजारी, विजय खापर्डे उपस्थित होते. रक्त संकलन डॉ. सचिन करंजेकर, सुरेखा भिवगडे, रक्तपेढी परिचर राजू नागदेवे, राहुल गिरी, मयूर खोब्रागडे यांनी केले. 
यावेळी यामिनी देशमुख, अनामिका कोड्डे, दुर्गा भुते, तेजस्विनी वरंभे यांनी सहकार्य केले.
शिबिरासाठी योगेश देशकर, मिलिंद परशुरामकर,जागेश्वर कांबळे, आकाश तिघरे, रोहित भुरले, मोहित रायपुरे, सौरभ राऊत, सिद्धार्थ युथ क्लबचे अध्यक्ष कामेश बावणे, निखिल मोहुर्ले, कुलदीप दोनाडकर, सौरभ बंसोड, साहिल गजभिये, अभिषेक घोरमोडे, दर्शन मेश्राम, नितीन पारधी, ‘लोकमत’चे वितरक प्रमोद टेंभुर्णे, तालुका सखी संयोजिका कल्पना जाधव यांचे सहकार्य मिळाले. संचलन लोकमत तालुका प्रतिनिधी दयाल भोवते यांनी केले तर आभार साकोली लोकमत सखी मंच संयोजिका सुचिता आगाशे यांनी मानले.

अधिकाऱ्यांचे रक्तदान
- लाखांदूर येथील रक्तदान शिबिर आगळेवेगळे ठरले. या शिबिरात तालुक्यातील अधिकाऱ्यांनी : रक्तदान केले. यात नायब तहसीलदार,  वनपरिक्षेत्रधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक यांचा समावेश आहे. रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी स्वत: रक्तदान करून युवकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले.

यांनी केले रक्तदान
- नायब तहसीलदार देवीदास पाथोडे, वनपरीक्षेत्रधिकारी रुपेश गावीत, पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, पोलीस उपनिरीक्षक अमोल कोकाटे, शिक्षक प्रेमलाल गावडकर, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष धनराज हटवार, जयपाल राऊत, दर्शन मेश्राम, मिलिंद परशुरामकर, रोहित सोनवने, साहिल गजभिये, मुदतशिर पठाण, अभिषेक घोरमोडे, कुलदीप दोनाडकर, कामेश बावणे, निखिल मोहुर्ले, दयाल भोवते आदींनी रक्तदान केले.

 

Web Title: The blood donation movement of ‘Lokmat’ is inspiring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.