भाजप शिक्षक आघाडीचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:43 IST2021-09-09T04:43:15+5:302021-09-09T04:43:15+5:30

भंडारा : शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी येथील गांधी चौकात भारतीय जनता पक्ष शिक्षक आघाडीच्या वतीने धरणे देण्यात आले. ‘शिक्षकों ...

BJP teachers lead | भाजप शिक्षक आघाडीचे धरणे

भाजप शिक्षक आघाडीचे धरणे

भंडारा : शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी येथील गांधी चौकात भारतीय जनता पक्ष शिक्षक आघाडीच्या वतीने धरणे देण्यात आले. ‘शिक्षकों के सम्मान में भाजप मैदान में’ अशा घोषणांनी गांधी चौक दणाणून गेला.

या आंदोलनाचे नेतृत्व भाजप शिक्षक राज्य संयोजक डाॅ. उल्हास फडके, जिल्हा संयोजक कैलाश कुरंजेकर यांनी केले. यावेळी जिल्हा भाजप महामंत्री प्रा. डाॅ. हेमंत देशमुख, शहर अध्यक्ष संजय कुंभलकर, घनश्याम तरोणे, दिनेश साकुरे, दिलीप राठी, मनोज नलंगे, सारंग महांकाळ, अमोल हलमारे, अरुण मोखरे, रश्मी मोहरकर अश्विनी महाकाळकर, सुषमा कुरंजेकर, नगरसेवक रुबी चढ्ढा, आशू गोंडाणे, कैलाश तांडेकर, मनोज बोरकर, प्रेमचंद भोपे, अजीज शेख, शैलेश मेश्राम, भूपेश तलमले, टिळक वैद्य, अमित बिसने, आकाश फाले, शुभम चौधरी आदी उपस्थित होते.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, भविष्य निर्वाह खाते तत्काळ सुरू करावे, १ तारखेला वेतन द्यावे, शिक्षक भरती प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, या व इतर मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले.

Web Title: BJP teachers lead