जिल्हा पणन कार्यालयाला भाजपने ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:22 IST2021-07-03T04:22:54+5:302021-07-03T04:22:54+5:30
या आंदाेलनात ब्रह्मानंद करंजेकर, नेपाल रंगारी, वामन बेदरे, राजेश बांते, तिलक वैद्य, हेमंत देशमुख, प्रदीप पडाेळे, सुदाम शहारे, विलास ...

जिल्हा पणन कार्यालयाला भाजपने ठोकले कुलूप
या आंदाेलनात ब्रह्मानंद करंजेकर, नेपाल रंगारी, वामन बेदरे, राजेश बांते, तिलक वैद्य, हेमंत देशमुख, प्रदीप पडाेळे, सुदाम शहारे, विलास काटेखाये, मुन्ना फुंडे, घनश्याम खेडीकर, रेखाताई भाजीपाले, धनवंता राउत, विनाेद बांते, चंद्रप्रकाश द्रुगकर, चैतन्य उमाळकर, रामदास शहारे, काेमल गभणे, कल्याणी भुरे, संजय कुंभलकर, दिनेश निमकर, सुरेंद्र आयतुलवार, अनुष्का खैरे, विनाेद भुरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.
बाॅक्स
आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे : फुके
आपल्या राजकारणासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरून त्यांना देशाेधडीला लावण्याचे काम आघाडी सरकार करीत आहे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. त्यांना त्यांचे अधिकार मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे आमदार डाॅ. परिणय फुके यांनी सांगितले.
बाॅक्स
शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका - मेंढे
शेतकऱ्यांची दिशाभूल करून अधिक काळ राजकारण केले जाऊ शकत नाही. शेतकऱ्यांना गरज असताना मदत मिळत नसेल तर शेतकरी नेते म्हणून घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही. शेतकऱ्यांची दिशाभूल करणे बंद करा, अन्यथा भविष्यात आंदाेलनाची तीव्रता वाढविण्यात येईल, अशा इशारा खासदार सुनील मेंढे यांनी दिला.