भाजपच्या उमेदवाराची घोषणा ७ मे रोजी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:57 IST2018-05-06T00:57:39+5:302018-05-06T00:57:39+5:30

येत्या २८ मे रोजी होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपची संपूर्ण तयारी झालेली असून आता पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा ७ मे रोजी करण्यात येणार आहे. या पोटनिवडणुकीत शिवसेनेशी युतीसंदर्भात आतापर्यंत कोणताही निर्णय झालेला नसून पक्षश्रेष्ठींची चर्चा सुरू आहे.

BJP candidate will be announced on May 7 | भाजपच्या उमेदवाराची घोषणा ७ मे रोजी होणार

भाजपच्या उमेदवाराची घोषणा ७ मे रोजी होणार

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : शिवसेनेच्या युतीबाबत चर्चा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : येत्या २८ मे रोजी होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपची संपूर्ण तयारी झालेली असून आता पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा ७ मे रोजी करण्यात येणार आहे. या पोटनिवडणुकीत शिवसेनेशी युतीसंदर्भात आतापर्यंत कोणताही निर्णय झालेला नसून पक्षश्रेष्ठींची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्ष घेणार असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
शनिवारला आयोजित पत्रपरिषदेत ना. बावनकुळे म्हणाले, ज्यांना प्रशासकीय कामकाजाची माहिती आहे, असा उमेदवार या पोट निवडणुकीत भाजपकडून राहणार आहे. उमेदवारांविषयी असलेला निर्णय ७ मे रोजी होणार आहे. ९ मे रोजी भाजप उमेदवार नामांकन दाखल करणार असून त्यांच्या प्रचारासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन जाहिरसभा होतील. आपण पालकमंत्री या नात्याने लोकसभा क्षेत्रात ५० ठिकाणी सभा घेणार असल्याचे सांगितले.
माजी खासदार नाना पटोले यांनी दिलेला राजीनामा हा दुर्भाग्यपूर्ण असल्याचे सांगून ना.बावनकुळे म्हणाले, मागील साडेतीन वर्षात विकासाचे कोणतेही काम त्यांनी केले नाही. राजीनामा देऊन जनतेचा विश्वासघात केला.
साकोली येथील महत्त्वाकांक्षी ‘भेल’ प्रकल्पाबाबत ते म्हणाले, सरकार या प्रकल्पाला ‘रिडिजाइन’ करीत आहे. ज्या मापदंडावर ‘भेल’ प्रकल्प सुरू करण्यात आला त्या पूर्वीच्या सरकारने पूर्ण केलेल्या नाहीत. परिणामी हा प्रकल्प सुरू होऊ शकला नाही. विरोधी पक्ष अभ्यासाविना ‘भेल’ प्रकल्पाचे अपयश भाजप सरकारवर करीत आहे. परंतु ते संपुर्णत: चुकीचे आहे. पत्रपरिषदेला आ.बाळा काशीवार, आ.रामचंद्र अवसरे, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, तारीक कुरेशी, मुकेश थानथराटे उपस्थित होते.

Web Title: BJP candidate will be announced on May 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा