बिडी कामगार न्यायाच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: January 10, 2016 00:44 IST2016-01-10T00:44:00+5:302016-01-10T00:44:00+5:30
स्थानिक विदर्भ बिडी लि. कंपनीच्या बिडी कामगारांना येत्या आठ वर्षापासून न्याय मिळालेला नाही.

बिडी कामगार न्यायाच्या प्रतीक्षेत
दमानिया करणार नेतृत्व : १२ जानेवारीला महिला कामगारांशी संवाद साधणार
लाखनी : स्थानिक विदर्भ बिडी लि. कंपनीच्या बिडी कामगारांना येत्या आठ वर्षापासून न्याय मिळालेला नाही. बेकायदेशीर टाळेबंद करुन कंपनी प्रशासनाने हेतुपुरस्पर कामगारांना बेरोजगार बनविले. किमानदोन वेळचे जेवन समाधानाने मिळावे आणि सरकारने निर्धारित केलेल्या नियमानुसार किमान वेतन मिळावे अशी मागणी करताच अशिक्षीत व गरीब कामगारांविरुध्द षड्यंत्र रचण्यात आले. ज्यांचे पोटपाणी बिडी व्यवसायावर अवलंबुन आहे ते कंपनी बंद पाडण्याचा विचार करणार नाही असे पत्रकार परिषदेत सचिन अंबादे यांनी सांगितले.
बिडी व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या महिलांचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया करित आहेत. १२ जानेवारीला स्थानिक श्रीराम मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता विदर्भ बिडी कंपनीच्या अन्यायग्रस्त मजुराना कायदेशिर व अन्य शक्य त्या मार्गाने लवकरात लवकर न्याय कसा मिळवुन देता येईल. याकरिता मजुरांशी चर्चा करणार आहेत. व कायदेशीर लढाई लढणार आहेत.
विदर्भ बिडी कंपनीच्या कामगारांवर वेगवेगळे आरोप करुन छळ केला आहे. त्या निष्पाप कामगाराविरुध्द कंपनी प्रशासनाने अपप्रचार केला. काही प्रसिध्द व्यक्तींनी न्याय मिळवून देतो म्हणून आपले खिसे भरुन घेतले. कपंनीने आठ वर्षे बंद कालावधीतील मोबदला म्हणून १५ ते २० हजार रुपये देण्याचे आमिष दिले आहे व राजिनामा मागितला आहे. काही कामगारांना कमी रक्कम दाखविली आहे.
कामगारांच्या न्याय हक्कासाठी बनलेल्या युनियनच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी कामगारांना विश्वासात न घेता कंपनी प्रशासनाशी समझोता केला आहे. बिडी कामगारांच्या व्यथांना वाचा फोडण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणतेही राजकीय पुढारी, प्रशासकीय अधिकारी यांनी प्रयत्न केलेला नाही. अंजली दमानिया अन्यायग्रस्त, निराधार व गरीब कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करीत आहेत. सर्व बिडी कामगारांनी संघटित होण्याचे आवाहन सचिन अंबादे यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)