स्थानिक विकास निधीतून विकासकामांचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:24 IST2021-07-10T04:24:58+5:302021-07-10T04:24:58+5:30
भूमिपूजन पार पडलेल्या कामांमध्ये सुरेवाडा येथे बौद्ध विहाराजवळ सभामंडप बाधकाम, खमारी (बुटी) येथे धरमदास मेश्राम ते वामन मेश्राम यांच्या ...

स्थानिक विकास निधीतून विकासकामांचे भूमिपूजन
भूमिपूजन पार पडलेल्या कामांमध्ये सुरेवाडा येथे बौद्ध विहाराजवळ सभामंडप बाधकाम, खमारी (बुटी) येथे धरमदास मेश्राम ते वामन मेश्राम यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बाधकाम, मंडणगाव येथे दुधराम बांडेबुचे ते तुलाराम चामट यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बाधकाम करणे, मांडवी येथे बाजार चौकात सिमेंटीकरण करणे आदी कामांचा समावेश होता.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नरेंद्र झंझाड, कार्याध्यक्ष आरजू मेश्राम, उत्तम कळपते, सुजाता फेंडर, नितू सेलोकर, सुभाष तितीरमारे, माजी सरपंच प्रभू फेंडर, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हितेश सेलोकर, योगेश्वर राघोर्ते, तुकाराम हातझाडे, सरपंच माधुरी राघोर्ते, प्रदीप सुखदेव, डॉ.प्रवीण थुलकर, दिलीप मोटघरे, मनिष खोब्रागडे, दिनेश खोब्रागडे, क्रिष्णा थोटे, राजू मोटघरे, रजनीश बन्सोड, डॉ.मडामे, विकेश मेश्राम, सहसराम कांबळे, प्रभाकर सार्वे, तसेच सुरेवाडा, खमारी, मंडणगाव, मांडवी येथील सरपंच, उपसरपंच, सचिव, सदस्य व गावकरी उपस्थित होते.
090721\1431-img-20210708-wa0131.jpg
. प्रफुल्ल पटेल यांच्या स्थानिक विकास निधितून विकास कामांचे भूमिपूजन