तुमसर शहरात विविध कामांचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:31 IST2021-04-03T04:31:35+5:302021-04-03T04:31:35+5:30
स्वच्छ महाराष्ट्र योजना, विशेष रस्ता अनुदान, चौदावा वित्त आयोग, दलित वस्ती सुधार योजना, वैशिष्ट्य पूर्ण योजना, विशेष रस्ता अनुदान, ...

तुमसर शहरात विविध कामांचे भूमिपूजन
स्वच्छ महाराष्ट्र योजना, विशेष रस्ता अनुदान, चौदावा वित्त आयोग, दलित वस्ती सुधार योजना, वैशिष्ट्य पूर्ण योजना, विशेष रस्ता अनुदान, अंतर्गत सदर कामे करण्यात येत आहे.
भूमिपूजन आमदार डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार राजू कारेमोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, उपाध्यक्षा गीता कोंडेवार, विरोधी पक्षनेते अमर रगडे, सभापती सचिन बोपचे, अर्चना भुरे, शीला डोये, किरणदेवी जोशी उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र संग्राम सैनिक नारायण फकीराजी चौधरी बालोद्यान, संत चोखामेळा समाजभवन, मुस्लीम कब्रस्तान समाज भवनाचे लोकार्पण करण्यात आले. स्वच्छ महाराष्ट्र अभियान योजनेंतर्गत शिव मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. यावेळी नगरसेवक किशोर भवसागर, विद्या फुलेकर, छाया मलेवार, सुनील पारधी, रजनीश लांजेवार, पंकज बालपांडे, वर्षा लांजेवार, श्याम धुर्वे, कंचन कोडवानी, भारती धार्मिक, कैलाश पडोळे, खुशलता भवसागर, तारा गाणे, राजू गायधने, प्रमोद घरडे, सलाम तूरक, राजेश ठाकुर, स्मिता बोरकर, कल्याणी भुरे, आशिष कुकडे, मुन्ना पुंडे, शोभा लांजेवार, अन्नू रोचवानी, योगेश रंगवानी, स्वप्निल मनगटे, राकेश बोकडे उपस्थित होते.