सालेभाटा येथे सभागृहाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:39 IST2021-05-25T04:39:41+5:302021-05-25T04:39:41+5:30

कार्यक्रमाला पोवार समाजाचे अध्यक्ष चेतन भैरम, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई, जिल्हा काँग्रेस कमेटी उपाध्यक्ष ॲड. शफी ...

Bhumi Pujan of the hall at Salebhata | सालेभाटा येथे सभागृहाचे भूमिपूजन

सालेभाटा येथे सभागृहाचे भूमिपूजन

कार्यक्रमाला पोवार समाजाचे अध्यक्ष चेतन भैरम, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई, जिल्हा काँग्रेस कमेटी उपाध्यक्ष ॲड. शफी लद्दानी, जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष कैलाश भगत, लाखनी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजू निर्वाण, निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत निंबार्ते, महिला काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्षा मीनाक्षी बोपचे, आकाश कोरे, ज्ञानेश्वर राहांगडाले, सरपंच पुष्पलता सोनवाने, उपसरपंच जगदिश टेंभुर्णे, हेमचंद्र बोपचे, मैपाल बोपचे, योगेश पटले, देवराम पटले, खुशाल पटले, धनपाल बोपचे, ज्ञानेश्वर पटले, शेषराव बोपचे आदींची उपस्थिती होती.

अण्णा पाटील सार्वजनिक सभागृह बांधकामाकरिता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या स्थानिक विकास निधीतून २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. आ. अभिजित वंजारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना पोवार समाजाच्या सभागृहासाठी वाढीव ५ लक्ष रुपये निधीची घोषणा केली. पोवार समाजाचे अध्यक्ष चेतन भैरम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जय राजाभोज क्षत्रिय पोवार समाज संस्थेची स्तुती केली. कार्यक्रमाकरिता जय राजा भोज क्षत्रिय पोवार समाज संस्थेचे अध्यक्ष विजय बोपचे, खुमेश्वर राहांगडाले, तुषार राहांगडाले, विजय रिनाईत, रणवीर भगत, खुशाल पटले, संजीव राहांगडाले, संजय बोपचे, सुरेंद्र पटले, तेजलाल पटले, ज्ञानेश्वर पटले आदींनी सहकार्य केले.

Web Title: Bhumi Pujan of the hall at Salebhata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.