अवसरे यांच्या निधीतील विकासकामांचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2017 00:38 IST2017-01-08T00:38:54+5:302017-01-08T00:38:54+5:30
भंडारा तालुक्यातील विविध परिसरात आमदार अॅड.रामचंद्र अवसरे यांच्या निधीतील विविध विकास कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

अवसरे यांच्या निधीतील विकासकामांचे भूमिपूजन
भंडारा : भंडारा तालुक्यातील विविध परिसरात आमदार अॅड.रामचंद्र अवसरे यांच्या निधीतील विविध विकास कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष सुनिल मेंढे, जिल्हा परिषद सदस्य अरविंद भालाधरे, सुभाष आजबले, चंद्रप्रकाश दुरुगकर, भाजप महामंत्री रामकुमार गजभिये, प्रशांत खोब्रागडे, नितीन कडव, विनोद बांते करमचंद वैरागडे, बालू ठवकर, सभापती प्रल्हाद भुरे, पं.स. सदस्य परसराम देशमुख, गोवर्धन वैद्य, दर्शन भोंदे, अस्मिता चौव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडले.
या कामांमध्ये नाबार्ड अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पहेला चिखलपहेला रस्त्यावरील लहान पुलाचे भूमिपूजन, अर्थसंकल्प निधी अंतर्गत शहापूर सातोना रस्त्याची सुधारणा, अर्थसंकल्प निधी अंतर्गत रामटेक खात रस्त्याची सुधारणा, अर्थसंकल्प निधी अंतर्गत खोकरला गुंजेपार रस्त्याची सुधारणा, अर्थसंकल्प निधी अंतर्गत दाभा कोथुर्णा, बेटाळा रस्त्याची सुधारणा, अर्थसंकल्प निधी अंतर्गत कारधा खमारी खडकी रस्त्याची सुधारणा, नाबार्ड अर्थसहाय्य योजनेअंतर्गत कोका सोनकुंड रस्त्यावर लहान पुलाचे भूमिपूजन पार पडले.
यावेळी सरपंच मधुकर नागपुरे, सरपंच नैलीला दोडापे सरपंच अरुण कारेमोरे, सरपंच नरविर टेकाम, यशवंत भोयर, गुंडेराव पाठेकर राजू सेलोकर, वामन शहारे, भीमराव कहालकर, रमेश निंबार्ते, रविंद्र वंजारी, नरेंद्र पवनकर, मधुकर नागपुरे, संजय कुंभलकर अमित बिसने, संध्या गिरडकर, रणजित कोटांगले, रोशन ठवकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)