भंडारा एसआरपीएफच्या ताफ्याला वाहनाची धडक, पोलीस निरीक्षक जखमी
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: May 11, 2025 01:25 IST2025-05-11T01:24:02+5:302025-05-11T01:25:45+5:30
Bhandara News: गोंदियावरून नागपूरकडे जाणाऱ्या एसआरपीएफच्या ताफ्याला विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाची धडक बसली. यात पोलीस निरीक्षक धीरज उमलवाडकर जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजता च्या सुमारास घडली.

भंडारा एसआरपीएफच्या ताफ्याला वाहनाची धडक, पोलीस निरीक्षक जखमी
- गोपालकृष्ण मांडवकर
आंधळगाव (भंडारा ) - गोंदियावरून नागपूरकडे जाणाऱ्या एसआरपीएफच्या ताफ्याला विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाची धडक बसली. यात पोलीस निरीक्षक धीरज उमलवाडकर जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजता च्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, आंधळगाव जवळील जाम कांद्री फाट्यावरील खैरांची मोडवर गोंदिया जिल्ह्यातून नक्षलग्रस्त भागामधून सीआरपीएफ जवानांचा ताफा नागपूर येथील आपल्या युनिटमध्ये परत जाण्यासाठी निघाला होता. या ताब्यात एक पोलीस व्हॅन आणि एक बोलेरो कार होती. जाम कांद्री फाट्यावरील खैरलांजी वळणावर झायलो कारने (क्रमांक एम एच 15 डी एन 0135) गोंदियाकडून नागपूरकडे जाणाऱ्या जाणाऱ्या बोलोरो कारला (एमएच 35 डी 436) विरुद्ध दिशेने येऊन जबरदस्त धडक दिली. यात कार मधील नक्षल कर्तव्यावरील पोलीस निरीक्षक धीरज उमलवालकर हे जखमी झाले. त्यांच्या बोलोरो कारचा पठाण नामक चालक किरकोळ जखमी झाला आहे.
या घटनेची माहिती मिळतात आंधळगावचे पोलीस निरीक्षक सुनील राऊत यांनी घटनास्थळी पोहोचून जखमी पोलीस अधिकाऱ्यांना रुग्णालयात दाखल केले. वृत्त हाती येईपर्यंत पोलिसात या प्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल झालेला नव्हता.