Bhandara Crime: भंडारा जिल्ह्यात बुधवार पहाटेची रात्र चोरट्यांसाठी फायद्याची ठरली. भंडारा तालुक्यातील ठाणा, खरबी शहापूर आणि भंडारा शहरात असे मिळून २१ दुकाने फोडण्यात आली. नऊ जणांच्या टोळीने या सर्व कारवायाला अंजाम दिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
बुधवारी मध्यरात्री १२ ते पहाटे ५ वाजताच्या सुमारास ही दुकाने फोडण्यात आल्याची माहिती आहे. खरबी येथे तीन, ठाणा येथे तीन तर शहापूर येथे चार दुकाने फोडण्यात आली. त्यातून मुद्देमाल चोरण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहेत.
याशिवाय भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक या अर्ध्या किलोमीटरच्या पट्ट्यातील एकूण ११ दुकाने चोरट्यांनी फोडली. लोखंडी साबळ व अन्य अवजारांचा वापर करून शटर वाकविल्याचे प्रत्यक्षरीत्या दिसून आले. विशेष म्हणजे चोरट्यांनी दुकानातील अन्य कोणतेही सामान न चोरता फक्त रोख चोरण्यावरच भर दिल्याचे लक्षात आले. एकाच रात्री एवढी दुकाने फोडण्यात आल्याने पोलिसांनी प्रकरण गंभीरतेने घेतल्याचे दिसून येते.
श्वानपथकाला प्रथकाला पाचारण
घटना उघडकिला आल्यानंतर भंडारा पोलीस दलातील श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडल्याने शहरात सह ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Web Summary : A gang of thieves targeted 21 shops in Bhandara, Maharashtra, within five hours. The overnight spree, spanning multiple locations, focused primarily on stealing cash, causing widespread concern and prompting a police investigation with a canine unit.
Web Summary : भंडारा, महाराष्ट्र में चोरों के एक गिरोह ने पांच घंटे में 21 दुकानों को निशाना बनाया। कई स्थानों पर हुई इस चोरी में मुख्य रूप से नकदी चुराई गई, जिससे व्यापक चिंता फैल गई और पुलिस ने खोजी कुत्ते की मदद से जांच शुरू कर दी है।