Bhandara : साकोलीतील कंत्राटी शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: March 12, 2024 19:39 IST2024-03-12T19:38:53+5:302024-03-12T19:39:21+5:30
Bhandara News: साकोली येथील एम बी पटेल कॉलेज रोडवर राहणाऱ्या मिलिंद घोडीचोर या युवकाने नायलॉन दोरी बांधून आत्महत्या केल्याची घटना सकाळी ८:३० वाजता उघडकीस आली.

Bhandara : साकोलीतील कंत्राटी शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
- गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा - साकोली येथील एम बी पटेल कॉलेज रोडवर राहणाऱ्या मिलिंद घोडीचोर या युवकाने नायलॉन दोरी बांधून आत्महत्या केल्याची घटना सकाळी ८:३० वाजता उघडकीस आली.
मिलिंद घोडीचोर हे मागील १० वर्षापासून गोंदिया एज्युकेशन सोसायटी द्वारा एम बी पटेल कॉलेज येथे इंग्लिश विषयाचे कंत्राटी शिक्षक म्हणून काम करत होते. मागील काही दिवसापूर्वी शिक्षक भरती झाली. परंतु १० वर्षे काम करून नोकरी मिळाली नाही. त्याच निराशेतून राहत्या घरी वरचा मजल्यावर पंंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, अशी चर्चा गावात रंगत आहे.
मिलींद हा सकाळी चहा घेऊन दाढी करण्यासाठी वरच्या मजल्यावर गेला. बराच वेळ होऊनही ते खाली न उतरल्याने पहाण्यासाठी मोठा भाऊ वर बघायला गेला असता, तो पंख्याला गळफास घेतल्या अवस्थेत दिसला. भावाने लगेच घराशेजारील लोकांना बोलवून खाली उतरवले. परंतु तो पर्यंत मृत्यू झाला होता. आत्महत्या करण्याचे ठोस कारण कळू शकले नाही. पुढील तपास पोलिस निरीक्रक उमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात अमितेश वडेट्टीवार करीत आहेत.