शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या इतिहासात दुसऱ्या विक्रमी पुरवणी मागण्या; ७५,२८६ कोटींची तरतूद; वित्तीय शिस्त बिघडल्याचा विरोधकांचा आरोप
2
आमदारांच्या फुटीवरून रंगले दावे अन् प्रतिदावे; मुख्यमंत्री म्हणाले, ते २२ आमदार आमचेच
3
भाजपची गुगली; वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत विरोधी पक्षनेतेपद!
4
आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक
5
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
7
'वंदे मातरम्'चे काँग्रेसने तुकडे केले, तुष्टीकरणाचे राजकारण सुरूच : मोदी
8
इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल
9
गोव्यात कसिनोंवरील नाइट ‘जीवघेणा जुगार’; आग लागल्यास माराव्या लागतील मांडवी नदीत उड्या
10
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
11
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
12
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
13
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
14
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
15
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
16
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
17
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
18
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
19
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
20
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Bhandara Fire : भंडारा घटनेतील सात शिशूंना सुरक्षित स्थळी हलविले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 14:13 IST

Bhandara Fire : संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नऊ शिशूंचे मृतदेह संबंधित नातेवाईकांकडे सोपविण्यात आले आहेत.

भंडारा - भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता वार्डात लागलेल्या अचानक आगीत 17 नवजात शिशूपैकी 7 शिशूंना वैद्यकीय चमू व अग्निशमन विभागाच्या चमूंनी तात्काळ बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले. परंतु या दुर्घटनेत 10 शिशू मृत पावले आहेत.  जिल्हा सामान्य रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता वार्डात (एसएनसीयु) येथे रात्रो उशिरा आग लागली. भंडारा नगर परिषद, सुरक्षा कर्मचारी व पोलीस पथकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासोबतच ती  इतरत्र पसरु नये यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आग पूर्णत: विझविण्यात आलेली असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. 

लहान मुलांच्या अतिदक्षता वार्डात 17 नवजात शिशू दाखल झाले. त्यापैकी 10 शिशू मृत झाले असून त्यांच्या मातांची नावे याप्रमाणे,  1 - आईचे नाव - हिरकन्या हिरालाल भानारकर  (मृतबालक-स्त्री) रा. उसगाव (साकोली), 2 - आईचे नाव - प्रियंका जयंत बसेशंकर (मृतबालक-स्त्री) रा. जांब (मोहाडी),  3 - आईचे नाव - योगिता विकेश धुळसे   (मृतबालक-पुरुष) रा. श्रीनगर पहेला (भंडारा), 4- आईचे नाव - सुषमा पंढरी भंडारी (मृतबालक-स्त्री) रा. मोरगाव अर्जुनी (गोंदिया), 5 - आईचे नाव - गिता विश्वनाथ बेहरे (मृतबालक-स्त्री) रा. भोजापूर (भंडारा), 6 - आईचे नाव- दुर्गा विशाल रहांगडाले (मृतबालक-स्त्री) रा. टाकला (मोहाडी), 7 - आईचे नाव - सुकेशनी धर्मपाल आगरे (मृतबालक-स्त्री) रा. उसरला (मोहाडी), 8 - आईचे नाव - कविता बारेलाल कुंभारे (मृतबालक-स्त्री) रा. सितेसारा आलेसूर (तुमसर), 10 - आईचे नाव - वंदना मोहन सिडाम (मृतबालक-स्त्री) रा.रावणवाडी (भंडारा), 10 - अज्ञात (मृतबालक-पुरुष).

संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नऊ शिशूंचे मृतदेह संबंधित नातेवाईकांकडे सोपविण्यात आले आहेत.  सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या बालकांमध्ये एका जुळ्यांचा समावेश आहे. यामध्ये 1 - आईचे नाव - शामकला शेंडे  (बालक-स्त्री), 2 - आईचे नाव - दीक्षा दिनेश खंडाते (बालक - स्त्री (जुळे), 3 - आईचे नाव - अंजना युवराज भोंडे (बालक-स्त्री), 4 - आईचे नाव - चेतना चाचेरे (बालक-स्त्री), 5 - आईचे नाव - करीश्मा कन्हैया मेश्राम (बालक-स्त्री),  6 - आईचे नाव - सोनू मनोज मारबते (बालक-स्त्री).

बालकांच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीसंदर्भातील प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्तीव्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संदीप कदम यांनी सादर केला आहे.

टॅग्स :Bhandara Fireभंडारा आगMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरे