शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

'कृषी हब'साठी भंडारा बाजार समितीला हवाय १५२ कोटींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 11:56 IST

Bhandara : विकास आराखडा मंजुरीसाठी पुणे येथील पणन संचालकांच्या दालनात

युवराज गोमासे लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : कृषी उत्पन्न बाजार समिती दुरवस्थेची कात टाकण्यास आसुसली आहे. सभापती व समिती संचालकांनी 'कृषी हब' विकासाचा नवा रोडमॅप तयार केला आहे. भरारीला बळ देणारा १५२ कोटी ४४ लाख ८६ हजार ६७३ रुपयांचा नवा आराखडा २० मार्च २०२४ रोजी पुणे येथील पणन संचालकांच्या मंजुरीसाठी पाठविला आहे. आता प्रतीक्षा आहे ती समितीला विकासाचे नवे पंख मिळण्याची.

भंडारा बाजार समिती २९ डिसेंबर १९६० रोजी अस्तित्वात आली. परंतु, सध्या चोहोबाजूने झालेल्या अतिक्रमणामुळे अधोगतीला आली आहे. पर्याप्त पार्किंग सुविधांचा अभाव आहे. शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. ही दुरवस्था संपविण्यासाठी सभापती विवेक नखाते, उपसभापती नामदेव निंबार्ते, संचालक शरद मेश्राम, हितेश सेलोकर, नरेंद्र झंझाड, विनोद थानथराटे, भगवान बावणकर, जयराम वंजारी, विजय लिचडे, रमाबाई भुरे, पुष्पमाला मस्के, रामलाल चौधरी व सचिव सागर सार्वे यांनी पुढाकार घेतला आहे. 

नऊ एकर जागेसाठी भरले २.७५ कोटीसन २००८ मध्ये मिलेवाड्याजवळ नवा व जुन्या राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध असलेली गटक्रमांक ९४/१ मधील ३.६० हेक्टर आर (९ एकर) जागेची मागणी तत्कालीन संचालक मंडळाने शासनाकडे केली होती. २७ एप्रिल २०२१ रोजी २ कोटी ७५ लाख ५० हजार ४०० रुपये शासन निधी भरून ही जागा ताब्यात घेतली आहे.

भिलेवाड्यात सुरु होणार उपमार्केट यार्ड भिलेवाडा येथे दोन्ही राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागी विदर्भातील सुसज्ज असे मार्केट यार्ड तयार करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. शेतमालाच्या खरेदी- विक्रीसाठी तसेच अन्य मालाच्या नियमनासाठी ११ ऑक्टोबर २०२१ रोजी जय किसान उपमार्केट यार्ड भिलेवाडा म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

विकास आराखड्यात राहणार अशा सुविधाविकास आराखड्यात महामार्गाला लागून पेट्रोल, शेतकरी निवासस्थान व कॅन्टीन, दीड एकरात फळे व भाजीपाला मार्केट, लिलावगृह, दीड एकरात जनावरांचा बाजार, दीड एकरात वाहनांची पार्किंग, वेस्टेज शेतमालापासून कंपोस्ट खतनिर्मिती, सोलर ऊर्जा व रेन वॉटर हार्वेस्टिंग, मछली मार्केट, ५ हजार मेट्रिक टन क्षमतेची तीन गोडावून, शीतगृह, प्रशस्त प्रशासकीय इमारत व कंपाऊंड, रस्ते व पाणी सुविधा तसेच अन्य सुविधांची उभारणी होणार आहे.

टॅग्स :Bhandara Fireभंडारा आग