Bhandara-Gondia by elections 2018 LIVE : गोंदियामध्ये मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 09:37 IST2018-05-30T07:46:18+5:302018-05-30T09:37:14+5:30
गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघातील 49 बुथवर मतदान सुरू झाले आहे.

Bhandara-Gondia by elections 2018 LIVE : गोंदियामध्ये मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड
भंडारा-गोंदिया - गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघातील 49 बुथवर मतदान सुरू झाले आहे. भंडाऱ्यातील 18 तर गोंदियाच्या 31 केंद्रांवर फेरमतदान घेण्यात येत आहे. मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्यामुळे याठिकाणी फेरमतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं जाहीर केला.
मतदान यंत्रांमध्ये कुठेच बिघाड झालेला नाही, कुठेही फेरमतदान होणार नाही, अशी भूमिका सोमवारी (28 मे) संध्याकाळी व मंगळवारी (29 मे) सकाळी निवडणूक आयोगाने घेतली होती. मात्र नंतर मात्र, गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघातील ४९ बुथवर फेरमतदान घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे हे कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरले, असा ठपका ठेवून त्यांची ताबडतोब बदली करण्यात यावी, असेही आदेश निवडणूक आयोगाने दिले. त्यानुसार, राज्य सरकारने काळे यांची लगेच बदलीही केली. मात्र, काळे यांच्याकडून कर्तव्यात काय कसूर झाली, हे मात्र आयोगाने स्पष्ट केलेले नाही.
( ईव्हीएमची झुंडशाही आणि ‘चोळकरां’ची लोकशाही प्रकार खतरनाक, उद्धव ठाकरेंचं भाजपावर टीकास्त्र )
LIVE UPDATES
- गोंदिया शहरात मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड. बटण दाबल्यानंतर 10 मिनिटांनी मतदान होत आहे. 233 क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील प्रकार