भंडारा जिल्ह्यात विजेचा धक्का लागून महिला व मुलगा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 11:15 IST2018-10-10T11:14:58+5:302018-10-10T11:15:25+5:30

जिल्ह्यातील तुमसर येथे शारदा देवीची स्थापना करण्यासाठी लोखंडी पाईप आणताना विजेचा धक्का लागून मुलगा गंभीर जखमी झाला.

In Bhandara district, the woman and boy were injured | भंडारा जिल्ह्यात विजेचा धक्का लागून महिला व मुलगा जखमी

भंडारा जिल्ह्यात विजेचा धक्का लागून महिला व मुलगा जखमी

ठळक मुद्देमुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात महिला जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: जिल्ह्यातील तुमसर येथे शारदा देवीची स्थापना करण्यासाठी लोखंडी पाईप आणताना विजेचा धक्का लागून मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला वाचविण्यासाठी गेलेली शेजारची महिलाही यात जखमी झाली. ही घटना बुधवारी सकाळी ८.३० वाजता घडली.
जतीन मोरेश्वर खरवडे (१४) रा.माकडे नगर, तुमसर असे जखमी मुलाचे नाव आहे. मंगला शिंदे रा. माकडे वॉर्ड तुमसर असे महिलेचे नाव आहे. जतीनला भंडारा येथे उपचारासाठी रवाना करण्यत आले आहे. तर महिलेवर तुमसर येथे उपचार सुरू आहे. विजेचा धक्का लागल्याने मुलगा गंभीररित्या भाजला आहे.

 

Web Title: In Bhandara district, the woman and boy were injured

टॅग्स :Accidentअपघात