शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

प्राचीन काळापासून भंडारा जिल्हा बौद्धमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

मान्यवरांच्या हस्ते सिल्ली येथील पुंडलिकराव तिरपुडे यांना त्यांच्या मरणोत्तर सन्मानचिन्ह देण्यात आले. सदर सन्मानचिन्ह त्यांचे भाऊ वासुदेव तिरपुडे यांनी स्वीकारला. धम्मचारी पदमबोधी म्हणाले, सिल्ली येथील मिनी दिक्षाभूमीची दखल सर्वांना घेणे गरजेचे आहे. कारण गत सहा वर्षापासून हा परीसर आजही पहिल्याप्रमाणेच स्वच्छ दिसत असल्याने येथील समाजाची एकजूट यावरून दिसून येते.

ठळक मुद्देधम्मचारी पदमबोधी : सिल्ली येथील मिनीदीक्षाभूमीच्या सहाव्या वर्धापन दिन उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सिल्ली येथील मिनी दीक्षाभूमीलाच वंदन न करता संपूर्ण भंडारा जिल्ह्याच्या भूमीला वंदन करणे गरजेचे आहे. मिनी दीक्षाभूमीच नव्हे तर संपूर्ण भंडारा जिल्हा हा प्राचीन काळापासूनच बौद्धमय असून, बुद्धभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. करीता भंडारा जिल्हा हा पुजनिय आहे, असे प्रतिपादन धम्मचारी पदमबोधी यांनी केले.
भंडारा तालुक्यातील सिल्ली येथील बुध्द विहार समितीच्या वतीने मिनीदिक्षाभूमीच्या सहाव्या वर्धापन दिनाच्या आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदशक म्हणून ते बोलत होते.
५ फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भंडाराचे माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, तर अध्यक्षस्थानी अमृत बन्सोड उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून धम्मचारी पदमबोधी व प्रमुख पाहूणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते गुलशन गजभिये, सिल्लीचे सरपंच निर्भय क्षीरसागर, डॉ. विनोद भोयर, प्राध्यापक नागसेन, बावनकर, कास्ट्राईबचे महासंघटक सुर्यकांत हुमणे, विनोद विद्यालयाचे प्राचार्य अनमोल देशपांडे, ज्येष्ठ नागरिक देवराम बन्सोड, बुध्द विहार समितीचे अध्यक्ष अंबादास गजभिये, सचिव सामंत सुखदेवे आदी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते सिल्ली येथील पुंडलिकराव तिरपुडे यांना त्यांच्या मरणोत्तर सन्मानचिन्ह देण्यात आले. सदर सन्मानचिन्ह त्यांचे भाऊ वासुदेव तिरपुडे यांनी स्वीकारला. धम्मचारी पदमबोधी म्हणाले, सिल्ली येथील मिनी दिक्षाभूमीची दखल सर्वांना घेणे गरजेचे आहे. कारण गत सहा वर्षापासून हा परीसर आजही पहिल्याप्रमाणेच स्वच्छ दिसत असल्याने येथील समाजाची एकजूट यावरून दिसून येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरू तथागत गौतम बुद्ध, संत कबीर व महात्मा फुले अहिंसक व शांततेचे दूत होते. त्यांच्या या गुरूमुळे स्वातंत्र, समता व बंधुता यांच्या जोरावर त्यांनी या बहुजन समाजाला मानसिक गुलामगिरीतून मुक्त केले. देव, दैववाद झुगारल्याशिवाय आपण आंबेडकरवाद स्वीकारू शकत नाही. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवांच्या विचारांवर चालून स्वत:ला प्रकाशित करा व माणसाला माणूस समजूनच वागणूक द्या. डॉ. बाबासाहेबांच्या वाटचालीत माता रमाईने दिलेला मोलाचा वाटा व केलेला त्याग अत्यंत महत्त्वाचा आहे. माई रमाई नसती तर कदाचित बाबासाहेब घडलेच नसते, असे त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविक संदीप गजभिये, संचालन विलास खोब्रागडे, आभार प्रदर्शन विनोद विद्यालय सिल्लीचे प्राचार्य अनमोल देशपांडे यांनी केले. कार्यक्रमासाठी सिल्ली येथील बुध्द विहार समितीचे अध्यक्ष अंबादास गजभिये, उपाध्यक्ष चंद्रमनी सरादे, सचीव सामंत सुखदेवे, सहसचिव प्रमोद बन्सोड आदींनी सहकार्य केले.