भंडारा जिल्ह्यात काेराेना वर्षात मद्यपींनी रिचविली ८४ लाख लीटर दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 05:00 IST2021-04-11T05:00:00+5:302021-04-11T05:00:46+5:30
लाॅकडाऊनच्या काळात मद्यविक्रीत घट आल्याचे दिसून येत असून मार्च महिन्यात दारूची सर्वाधिक विक्री झाल्याचे दिसून येते. भंडारा जिल्ह्यात परवानाधारक देशी-विदेशी दारू विक्री दुकानांसह बिअरबार आणि वाईनबारमध्ये दारू अधिकृतरित्या विकली जाते. गत वर्षी काेराेनाचा संसर्ग असल्याने एप्रिल महिन्यात एक लीटरही दारूची विक्री झाली नाही. अनलाॅक प्रक्रियेंतर्गत सर्वप्रथम दारू विक्रीलाच त्यामुळे मे महिन्यापासून सर्वत्र सुरू झाली.

भंडारा जिल्ह्यात काेराेना वर्षात मद्यपींनी रिचविली ८४ लाख लीटर दारू
संताेष जाधवर
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : काेराेना संसर्ग वर्षात भंडारा जिल्ह्यात मद्यपींनी तब्बल ८४ लाख ७ हजार ६१६ लीटर दारू रिचविली असून देशी दारूच्या विक्रीत गत वर्षीच्या तुलनेत ८ लाख लीटर म्हणजे २३ टक्केने वाढ नाेंदविण्यात आली. विशेष म्हणजे विदेशी दारू आणि बिअरबारची मागणी घटल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विवरण पथकावरून स्पष्ट हाेेते.
लाॅकडाऊनच्या काळात मद्यविक्रीत घट आल्याचे दिसून येत असून मार्च महिन्यात दारूची सर्वाधिक विक्री झाल्याचे दिसून येते. भंडारा जिल्ह्यात परवानाधारक देशी-विदेशी दारू विक्री दुकानांसह बिअरबार आणि वाईनबारमध्ये दारू अधिकृतरित्या विकली जाते. गत वर्षी काेराेनाचा संसर्ग असल्याने एप्रिल महिन्यात एक लीटरही दारूची विक्री झाली नाही. अनलाॅक प्रक्रियेंतर्गत सर्वप्रथम दारू विक्रीलाच त्यामुळे मे महिन्यापासून सर्वत्र सुरू झाली. एप्रिल ते मार्च या कालावधीत ६८ लाख ६ हजार ५२५ लीटर देशी दारूची विक्री करण्यात आली. गत वर्षी ५५ लाख ३० हजार ४४२ लीटर दारू विकण्यात आली हाेती. गतवर्षीच्या तुलनेत मद्यपीनीं ७२ लाख ७६ हजार १८४ लीटर मद्य अधिक रिचवल्याचे दिसून येत आहे.
एप्रिल ते मार्च महिन्यात विदेशी दारूची विक्री १५ लाख २ हजार ९१२लीटर झाली हाेती. गत वर्षी हीच विक्री १६ लाख २६ हजार ७७८ लीटर हाेती. विदेशी दारूच्या विक्रीत एक लाख ७६ हजार ७६६ लीटरची घट नाेंदविण्यात आली. ८ लाख ३७ हजर ९३०लीटर बिअरची विक्री काेराेना वर्षात झाली हाेती. त्यापूर्वी ही विक्री ९ लाख ७४ हजार ८१६ लीटर हाेती. एक लाख ३६ हजार आठशे ८६ लीटर बिअर कमी विकली गेली.
वाईनची विक्री वाढली
उच्चभ्रू नागरिकांमध्ये वाईन सेवन करण्याचे फॅड भंडारा जिल्ह्यातही वाढत असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट हाेते. २०२०-२१ या आर्थिक वर्षात वाईन विकण्यात आली हाेती. तर२०१९-२० मध्ये ११ हजार ५६०लीटर वाईन विकली गेली हाेती. दाेन हजार ५८७ वाईनच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
लाॅकडाऊनने एप्रिलमध्ये विक्री शून्य
गतवर्षी एप्रिल महिन्यात काेराेना संसर्गाने लाॅकडाऊन घाेषित करण्यात आले हाेते. मद्यविक्रीलाही बंदी करण्यात आली हाेती. त्यामुळे मद्यपींची माेठी अडचण झाली हाेती. या कालावधीत जिल्ह्यात कुठेही एक लीटर दारू विकली गेली नाही. मात्र लाॅकडाऊन लागण्यापूर्वी अनेकांनी दारूचा साठा करून ठेवला हाेता. तर काहींनी आपला शाेक हातभट्टीच्या दारूवर भागविला हाेता.
जिल्ह्यातील परवानाधारक दारुविक्रेते बार, वाईनशाॅप, मालकानी शासनाने वेळाेवेळी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे. परवानाधारक बार मालकाने नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे कारवाई करण्यात येईल.
- शशिकांत गर्जे, अधीक्षक
राज्य उत्पादन शुल्क, भंडारा