भंडारा शहर एलईडीने होणार प्रकाशमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 21:24 IST2018-11-04T21:24:14+5:302018-11-04T21:24:34+5:30
महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार संपुर्ण शहरात एल.ई.डी. पथदिवे लावून विजेची बचत व्हावी हा उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून भंडारा नगर परिषदेनी साधारणता पाच कोटी खर्च करुन संपूर्ण शहराचे पथदिवे एल.ई.डी. पथदिवे द्वारे बदलवून देण्याचे कंत्राट ई.ई.एस.एल. या कंपनीला दिले असून कंपनीद्वारे हे उद्दीष्ट पुर्ण करण्याचे काम सुरु झाले आहे.

भंडारा शहर एलईडीने होणार प्रकाशमय
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार संपुर्ण शहरात एल.ई.डी. पथदिवे लावून विजेची बचत व्हावी हा उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून भंडारा नगर परिषदेनी साधारणता पाच कोटी खर्च करुन संपूर्ण शहराचे पथदिवे एल.ई.डी. पथदिवे द्वारे बदलवून देण्याचे कंत्राट ई.ई.एस.एल. या कंपनीला दिले असून कंपनीद्वारे हे उद्दीष्ट पुर्ण करण्याचे काम सुरु झाले आहे.
दिवाळी पुर्वी शहराच्या सर्व मुख्य मार्गावरील पथदिवे बदलविण्याचे काम पुर्ण होईल असे नगर परिषदेचे अध्यक्ष सुनील मेंढे यांनी सांगितले. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे. संपुर्ण शहरातील हायमास्ट खांबासहीत प्रत्येक खांबावरील पथदिवे एल.ई.डी. पथदिवे व्दारे बदलवून संपुर्ण शहर प्रकाशमय होईल असे अध्यक्ष सुनील मेंढे यांनी सांगितले.
ही शहरवासीयासाठी नगर परिषदेद्वारे प्रकाशपर्वावर प्रकाशमय एक भेट ठरेल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सदर कामाची सुरुवात गांधी चौकापासून करण्यात आलेली आहे. सर्व शहरवासियांना या उपक्रमाचा लाभ होईल यामुळे सवार्नी समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी नगराध्यक्ष सुनील मेंढे, उपाध्यक्ष आशू गोंडाणे, नगरसेवक मकसुद बंसी, शमीम शेख, अजिज शेख, जुगल भोंगाडे, मिलिंद मदनकर, दुपारे(विद्युत अभियंता) व कपाटे (संगणक अभियंता) तसेच नगर परिषद कर्मचारी वृंद व नागरिक उपस्थित होते.
या उपक्रमामुळे नगर परिषदेची होणारी दर महिन्याची विजेच्या बिलामधून जी बचत होईल त्यातून सदर कामाची किंमंत वसुल होईल असे नगर परिषदेचे अध्यक्ष सुनील मेंढे यांनी सांगितले.
तसेच सात वर्षाकरीता देखभाल व दुरुस्ती कंपनी व्दारे करण्यात येईल. त्यामुळे सात वर्षापर्यंत नगर परिषदेला कुठलाही खर्च करावा लागणार नाही. त्यामुळे दरवर्षी होणारा देखभाल दुरुस्तीच्या खर्चास मोठ्या प्रमाणात बचत येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.