भंडारा: पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 14:31 IST2018-03-27T14:30:50+5:302018-03-27T14:31:03+5:30
येथील पवनी तालुक्यात १७ वर्षांच्या मुलीला प्रसादाच्या पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन पळवून नेण्याची घटना सोमवारी घडली.

भंडारा: पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: येथील पवनी तालुक्यात १७ वर्षांच्या मुलीला प्रसादाच्या पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन पळवून नेण्याची घटना सोमवारी घडली. पवनी येथील नुजत बेगम (३५) हिने गौतम वॉर्डात राहणाऱ्या १७ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीला प्रसादातून गुंगीचे औषध दिले व उमरेड तालुक्यातील नांद बेसूर येथे पळवून नेले. तेथे आझाद खान (४५) या दुसºया आरोपीने तिच्यासोबत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या मुलीने प्रतिकार केल्यानंतर ते तिला भद्रावती येथे घेऊन गेले. या ठिकाणाहून सदर मुलीने धाडस करून स्वत:ची सुटका करून घेतली व पवनीला येऊन पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पवनी पोलिसांनी सोमवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करून घेतला असून पुढील तपास सुरू आहे.