लाखनी येथे भजनदिंडी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 22:04 IST2018-10-26T22:04:03+5:302018-10-26T22:04:45+5:30

लाखनी येथे जेएमसी कंपनीमार्फत सार्वजनिक मारोती देवस्थानची गुजरी चौकातील दहा एकर कृषक जागा बळकाविल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी भजनदिंडी आंदोलन करण्यात आले. मंदिर ते तहसीलकार्यालयापर्यंत ही दिंडी काढण्यात आली होती. दरम्यान तहसीलदार यांना निवेदन देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली.

Bhajan Dini movement in Lakhani | लाखनी येथे भजनदिंडी आंदोलन

लाखनी येथे भजनदिंडी आंदोलन

ठळक मुद्देप्रकरण कृषक जागा बळकाविल्याचे : भाविकांनी दिला तीव्र आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : लाखनी येथे जेएमसी कंपनीमार्फत सार्वजनिक मारोती देवस्थानची गुजरी चौकातील दहा एकर कृषक जागा बळकाविल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी भजनदिंडी आंदोलन करण्यात आले. मंदिर ते तहसीलकार्यालयापर्यंत ही दिंडी काढण्यात आली होती. दरम्यान तहसीलदार यांना निवेदन देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली.
जेएमसी कंपनीने मारोती देवस्थान लाखनीच्या जागेवरील बांधकाम तात्काळ थांबविण्यात यावे अशी आंदोलनकर्त्यांची मुख्य मागणी आहे. तसेच तहसील कार्यालय, नगरपंचायत कार्यालयतर्फे देण्यात आलेल्या सर्व परवानगी पत्र रद्द करण्यात यावे, तहसीलदार व नगर पंचायत मुख्याधिकारी व मधुकर हेडावू यांच्यावर तातडीने कारवाई करुन निलंबित करण्यात यावे, फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. यावर तहसीलदार विराणी यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाला शिफारस करुन परवानगी रद्द करण्यात येतील, अशी माहिती आंदोलनकर्त्यांना दिली. श्रीमारोती देवस्थानचे प्रकरण विश्वस्त विभागाकडे प्रलंबित आहे. सहायक धर्मदाय आयुक्तांची परवानगी नसतांनाही जेएमसी कंपनीला दहा एकर शेतजमीन देण्यात आली असल्याने लाखनीतील नागरिक व भाविकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.
यासंबंधाने सदर भजनदिंडी आंदोलन करण्यात आले. दरम्यान या आगळ्या वेगळ्या आंदोलनामुळे शहरवासीयांचे लक्ष वेधल्या गेली.

Web Title: Bhajan Dini movement in Lakhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.