मऱ्हेगाव येथे भागवत सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:36 IST2021-01-19T04:36:42+5:302021-01-19T04:36:42+5:30
मऱ्हेगाव/जुना येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा भागवत सप्ताह नियोजित केलेला आहे. गावात पारंपरिकतेचा आधार घेत भक्तगण मंडळी भागवत सप्ताहात हिरिरीने सहभाग ...

मऱ्हेगाव येथे भागवत सप्ताह
मऱ्हेगाव/जुना येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा भागवत सप्ताह नियोजित केलेला आहे. गावात पारंपरिकतेचा आधार घेत भक्तगण मंडळी भागवत सप्ताहात हिरिरीने सहभाग नोंदवितात. त्यांच्या उत्साहाला चालना मिळावी, याकरिता तरुण मंडळीसुद्धा ज्येष्ठांच्या विनंतीला मान देत भागवत सप्ताह दरवर्षी पार पडतात. भागवत सप्ताहात गाव स्वच्छता अभियान राबवितो. सातही दिवस शेतीचे कामे आटपून भागवत सप्ताहाला सहकार्य केले जाते. तरुण मंडळीचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो. रविवारला सायंकाळच्या प्रथम सत्रात महाराजांनी परिचयात्मक रीतीने भागवत सप्ताहाचे पहिले पुष्प गुंफले. या पहिल्या पुष्पात भागवत ग्रंथाचे महत्त्वा विस्तृत रूपाने भक्तगणांना समजावून सांगितले. भागवत ग्रंथाच्या श्रवणाने आयुष्याला काय फायदा होतो. याचा इतिहासातील कित्येक उदाहरणे देत भक्तगणांचा उत्साह वाढविला.
दैनंदिन भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमात काकड आरती दररोज सकाळी चार ते सहा या वेळेत महाराज व गुरुदेव सेवा भजनी मंडळ मऱ्हेगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडत आहे. हरिपाठ सकाळी ६ ते ७ वाजतापर्यंत ग्रामवासी जनतेसह प्रवचनकार हरिपाठाची भूमिका सांभाळत आहेत. रामधून सकाळी सात ते साडे आठ वाजेपर्यंत नियोजितपणे दररोज भक्तांच्या संगे पालखी सोहळा उत्साही वातावरणात टाळ-मृदंगाच्या सोबतीने पार पडत आहे. प्रवचन सकाळी व सायंकाळी नऊ ते अकरा या वेळेत नियोजितपणे सुरू आहे. महाराज यांच्या सोबतीला संगीत मंचात सहकार्याच्या भूमिकेत आर्गन गायक रवी महाराज उके, तबला वादक अभिषेक चेटुले महाराज, हरिपाठ व गायक प्रमोद लांडगे महाराज, दुसरे गायक मऱ्हेगावचे महाराज रूपेश सिंग, सोपान सेलोकर महाराज, झाकी दर्शन रोहित कुंभरे महाराज, ढोलक वादक फिरोज इलमकर महाराज, राकेश कुमार व धीरजकुमार महाराज तथा मऱ्हेगाव येथील संपूर्ण भजनी मंडळ सहभागी आहेत. रविवारला सर्वप्रथम गावचे हभप हरिश्चंद्र बेंदवार महाराज यांच्या हस्ते संपूर्ण गावाच्या साक्षीने हनुमान मंदिरात घटस्थापनेचे कार्यक्रम पार पडले. गावातील सर्व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. २३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजतापासून प्रवचन, दुपारी २ वाजता गोपालकाल्याचे कीर्तन व गोपालकाला त्यानंतर ग्रंथ पूजन व महाप्रसादाचे नियोजन केलेले आहे.