बनावट कागदपत्रावर सिंचन विहिरीचा लाभ
By Admin | Updated: August 23, 2014 23:48 IST2014-08-23T23:48:43+5:302014-08-23T23:48:43+5:30
ओलीताखाली असलेली शेती कोरडवाही दर्शवून तसेच शेतात सिंचन विहिर असताना सात बाऱ्यावर खोडतोळ करून तालुक्यातील मासळ येथील शेतकऱ्याने प्रशसनाची दिशाभूल करून सिंचन

बनावट कागदपत्रावर सिंचन विहिरीचा लाभ
लाखांदूर : ओलीताखाली असलेली शेती कोरडवाही दर्शवून तसेच शेतात सिंचन विहिर असताना सात बाऱ्यावर खोडतोळ करून तालुक्यातील मासळ येथील शेतकऱ्याने प्रशसनाची दिशाभूल करून सिंचन विहिर हडपल्याचा प्रकार उघडकीस आला. तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्याने तक्रारकर्त्याने उपोषणाचा इशारा दिला आहे.
तालुक्यातील मासळ येथील लालप्रसाद शामदेव गोंडाणे यांच्या माकलीच्या गट नं. २२९ आराजी १.०० हे.आर. मध्ये फार पूर्वीपासून सिंचन विहिर असून तसी सातबाऱ्यावर नोंद आहे. सदर शेती ओलीताखाली असल्याची नोंद आहे. परंतू सन २०१२-१३ मध्ये सदरहु व्यक्तीने सात बाऱ्यावर असलेली विहिरीची नोंद खोडतोड करून तसेच ओलीताखाली असलेली शेती कोरडवाहू दर्शवून रोजगार हमी योजने अंतर्गत पंचायत समितीमध्ये अर्ज दाखल केला. कोणत्याही प्रकारची फेर तपासणी न करता सचिव व तलाठ्यांनी कागदपत्र बनावट पुरविले व १ लक्ष ३१ हजार २५० रूपयाचा सिंचन विहिरीचा निधी मंजूर केला, सिंचन विहिरीचे बांधकाम केले.
एकीकडे ज्या शेतकऱ्यांना कोरडवाहू शेती फक्त सिंचनाची साधने उपलब्ध होत नाही. पंचायत समिती स्तरावर खेटरे मारून ही लाभाच्या योजना मिळत नाही. मात्र आर्थिक देवाण घेवाण करून योजना मनासारख्या मिळवितात. अशातला हा प्रकार असून तेथील शालिकराम राजाराम चुटे यांच्या लक्षात आला. हा प्रकार ग्रामपंचायत व शासन प्रशासनाची दिशाभूल करण्यात असून अशा लाभार्थ्यावर कार्यवाही होणे गरजेचे आहे.
यासाठी तहसीलदार, खंडविकास अधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी भंडारा यांचेकडे अनेकदा तक्रारी केल्या. परंतू असले प्रकार घेतल्या राहतात. तक्रार करूनही उपयोग नाही म्हणून येथील खंडविकास अधिकारी विजय झिंगरे यांनी चौकशी करण्याचे टाळले.
दि.३ एप्रिलचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लाखांदूरचे खंडविकास अधिकाऱ्यांना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ओलिताची शेती कोरडवाहू दाखवून व रेकार्डमध्ये खोडतोड करून विहिरीचा काम घेवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी चौकशीचे पत्र दिले. परंतु खंडविकास अधिकाऱ्यांनी पत्राला केराची टोपली दाखवत प्रकरण बंद केले. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून कार्यवाही झाली नाही तर उपोषणाला मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा शालिकराम चुटे यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)