जीवनाची जडणघडण ही विद्यार्थी दशेतूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:12 AM2017-11-15T00:12:29+5:302017-11-15T00:12:43+5:30

विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घ्यावा, गावातील कोणत्याही कामात मदत करावी. सहकार्य हाच कार्याचा आत्मा आहे.

This is the beginning of life | जीवनाची जडणघडण ही विद्यार्थी दशेतूनच

जीवनाची जडणघडण ही विद्यार्थी दशेतूनच

Next
ठळक मुद्देमनोजकुमार सूर्यवंशी : बालकदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घ्यावा, गावातील कोणत्याही कामात मदत करावी. सहकार्य हाच कार्याचा आत्मा आहे. जीवनाची जडणघडण ही विद्यार्थी दशेतूनच होते. संस्कारमय जीवन जगण्याकरिता स्वच्छता ही सेवा अभियानात सहभागी व्हा, असा सल्ला मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
देशभरात १४ नोव्हेंबर हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालकदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यवंशी यांनी त्यांच्या कक्षात विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी विविध शासकीय कामात सहकार्य केले. तसेच इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. महिला बाल कल्याण विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसंगे, शिक्षणाधिकारी प्राथमिक मोहन चोले, मोहाडीच्या शिक्षण विस्तार अधिकारी विभावरी पडोळे तसेच जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक यावेळी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सुर्यवंशी बालकदिनाचे औचित्य साधून म्हणाले की, प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांसाठी तक्रार पेटी ठेवण्यात यावी, त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या अडचणी सांगता येतील. विद्यार्थ्यांनी पुस्तकाचा ओझा वाढत आहे. तो कसा कमी करता येईल व त्यांना आरोग्यमय वातावरण कसे देता येईल याबाबत नियोजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थीनींनी आपल्या अडचणी सांगितल्या.चैतन्य विद्यालयात जागतिक अंडी दिन व वाचन प्रेरणा दिन या शासकीय कार्यक्रमात उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानेगाव बाजार येथील विद्यार्थ्यांनी वनराई बंधारा बांधकामात श्रमदानदान करून सहभागी झाले त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, महात्मा फुले हायस्कुल मोहगाव देवी, लाल बहादुर शास्त्री विद्यालय भंडारा येथील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी समुहगान सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

Web Title: This is the beginning of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.