श्रेष्ठ हो, संपूर्ण हो, नारी नव्या शतकातली

By Admin | Updated: March 9, 2016 01:33 IST2016-03-09T01:33:19+5:302016-03-09T01:33:19+5:30

‘चूल आणि मूल’ सांभाळायचा जणू अधोरेखीत कायदाच महिलांसाठी बनला आहे. पुरातन काळापासून महिलांना घराबाहेर ....

Be perfect, complete, woman in the new century | श्रेष्ठ हो, संपूर्ण हो, नारी नव्या शतकातली

श्रेष्ठ हो, संपूर्ण हो, नारी नव्या शतकातली

जागतिक महिला दिनी मिळाला विशेषाधिकार : एक दिवस सांभाळली अंमलदाराची भूमिका, सर्वच पोलीस ठाण्यात ‘महिलाराज’
प्रशांत देसाई भंडारा
‘चूल आणि मूल’ सांभाळायचा जणू अधोरेखीत कायदाच महिलांसाठी बनला आहे. पुरातन काळापासून महिलांना घराबाहेर पडण्यासाठी घरातील पुरूषांची परवानगी लागत असे. पुरूष प्रधान संस्कृतीचा पगडा लोप पावत चालला आहे. महिला आता पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक काम जबाबदारीने सांभाळीत आहेत. जागतिक महिला दिन जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘सोनेरी दिन’ ठरला.
सकाळी-सकाळी ठाण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्यांचे त्यांच्या सहकार्यांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले व दिवसभरासाठी त्यांच्यावर अंमलदाराची जबाबदारी सोपविण्यात आली. एक दिवसासाठी का होईना, त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीमुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये कामाचा आत्मविश्वास वाढला. आतापर्यंत केवळ सहकार्याची भूमिका निभावणाऱ्या या महिला कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष दिवसभराच्या घडामोडींवर बारकाइने नजर ठेवली. ऐवढेच नाही तर, त्यांनी आलेल्या प्रसंगाला समयसूचकतेने हाताळले, नव्हे त्यांच्यातील असलेले कसब त्यांनी दाखविले. यामुळे या महिला अंमलदारांना आभाळाला गवसणी घातल्याचा आभास होवून आभाळही ढेंगणे वाटले.
राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दिक्षित यांनी राज्यातील सर्व पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस मंगळवारी जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस स्टेशनची धुरा सांभाळतील असे निर्देश दिले. त्यानुसार, पोलीस स्टेशन हद्दीत घडणारे सर्व गुन्हे आणि डायरीवरील महत्त्वाची नोंद त्यांच्या स्वाक्षरीनिशी घेण्याचे निर्देश होते. त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी भंडारा जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता शाहू यांनी केली. जिल्ह्यातील प्रत्येक ठाणेदारांना निर्देश देत त्यांच्या अधिनस्त महिला कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविली.
भंडारा शहर पोलीस ठाण्यात याची अंमलबजावणी करण्यात आली. सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत. दुपारी २ ते रात्री ८ वाजेपर्यंत व रात्र पाळीतही महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावले. येथील महिला कर्मचाऱ्यांची नेहमी शिफ्टनुसार राहणारी ड्यूटी आज दिवसभरासाठी लावण्यात आली होती.
‘सिद्ध हो तू हेरूनी,
शक्ती तुझ्यातील आतली,
श्रेष्ठ हो, संपूर्ण हो,
नारी नव्या शतकातली’

सावित्रीच्या लेकींनी बजावले पोलीस ठाण्यात कर्तव्य
दुपारी २ ते रात्री ८ पर्यंत ड्यूटी इंचार्ज अधिकारी म्हणून महिला पोलीस उपनिरीक्षक माया चाटसे यांनी कर्तव्य सांभाळले. त्यांच्यासोबत नऊ महिला कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावले. अंमलदार म्हणून पोलीस हवालदार धानू पटले, स्टेशन डायरी अंमलदार म्हणून अश्विनी बोंदरे यांनी दिवसभर कर्तव्य बजावले. त्यांना ठाणा हजेरीसाठी पोलीस नाइक मिनाली विश्वास, संगणक कर्तव्यासाठी किर्ती तिवारी, वायरलेससाठी मनिषा चौधरी, महिला पोलीस कर्मचारी गीता धांडे
कैद्यांच्या रक्षणासाठीही महिला कर्मचारी
कैद्यांना ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात येते. येथील कैद्यांच्या संरक्षणासाठी दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात आली. महिला दिनी पुरूष कैद्यांना महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या निगरानीत राहावे लागण्याची नामुष्की पत्करावी लागली. या दोन महिलांमध्ये अल्का डहारे व आशा नागपूरे यांचा समावेश होता.
नवीन शिकायला मिळाल्याचा आनंद
पोलीस सेवेतून कर्मव्य बजावतांना महिला पोलिसांची नेहमी ड्यूटी वेळेनूसार राहत असे. मात्र, महिला दिनानिमित्त येथील महिला कर्मचाऱ्यांना आज एकाचवेळी कर्तव्य बजावण्याची संधी मिळाली. या कर्मचाऱ्यांची दिवसभरासाठी नेमण्यात आले होते. यावेळी त्यांनी दिवसभराच्या ठाण्याती दैनंदिन कामकाजासह आलेल्या फिर्यादींसोबत संवाद साधून तक्रारी दाखल केल्या. अनेक कर्मचाऱ्यांनी पहिल्यांदाच असे कर्तव्य बजावल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान व काम करण्याचा आत्मविश्वास दिसून येत होता.

Web Title: Be perfect, complete, woman in the new century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.