शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

बेटाळा नदीपात्रातील रेतीचा उपसा

By admin | Updated: July 26, 2014 23:57 IST

मोहाडी तालुक्यातील बेटाळा येथील नदीघाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा करण्यात येत आहे. रात्री येथून रेतीची अवैध वाहतूक करण्यात येत आहे. याला महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले असून

भंडारा : मोहाडी तालुक्यातील बेटाळा येथील नदीघाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा करण्यात येत आहे. रात्री येथून रेतीची अवैध वाहतूक करण्यात येत आहे. याला महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले असून यावर निर्बंध घालावा, अशी मागणी रामेश्वर राऊत यांनी केली आहे.बेटाळा येथील नदीघाटात मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा आहे. मागील काही दिवसांपासून येथून रेतीची मोठ्या प्रमाणात वाहतूक करण्यात येत होती. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने यावेळी नदीत पाणी येत असल्याने रेतीचा उपसा करता येत नाही. त्यामुळे रेतीचे साठे नदीघाटाजवळ करून ठेवण्यात आले. तक्रारीवरून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी जवळपास ७०० ब्रास रेतीचा साठा असताना त्यांच्याकडून मात्र १५० ब्रास रेतीसाठ्यांचा लिलाव करण्यात आला. लिलाव घेणाऱ्यांकडून सदर रेतीची उचल करण्यात येत आहे. मात्र १५० ब्रास व्यतिरिक्त उर्वरित रेतींचीही उचल सदर ठेकेदाराकडून करण्यात येत आहे. त्यामुळे यात महसूल विभागाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.नदीघाटातून बिना वाहतूक परवान्यासह रेतीचा मोठ्या प्रमाणात उपसा करून त्याची वाहतूक करण्यात येत आहे. त्यामुळे या सर्व बाबींवर आळा बसावा व शासनाचे नुकसान होवू नये याकरीता रात्रीची वाहतूक बंद करावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)