बे भा न धावताहेत रेतीचे टिप्पर!

By Admin | Updated: April 4, 2015 00:08 IST2015-04-04T00:08:25+5:302015-04-04T00:08:25+5:30

जिल्ह्याला गौण खनिजाची देणगी लाभलेल्या ‘रेती’ची खुलेआम तस्करी सुरू आहे.

Bayt is not running, Sandeep Tipper! | बे भा न धावताहेत रेतीचे टिप्पर!

बे भा न धावताहेत रेतीचे टिप्पर!

ना लगाम ! ना वचक : ग्रामीण भागातही भरधाव वाहनांमुळे ग्रामस्थ त्रस्त
भंडारा
: जिल्ह्याला गौण खनिजाची देणगी लाभलेल्या ‘रेती’ची खुलेआम तस्करी सुरू आहे. ही तस्करी मात्र ज्या वाहनाने सुरू आहे, ती टिप्पर, ट्रक, ट्रॅक्टर वाहने बेभानपणे रस्त्यावर धावत आहेत. या बेभान वाहनांमुळे कित्येक निष्पाप जीव गेले आहेत. नदीकाठच्या गावातून ट्रॅक्टरच्या सहाय्याने रेतीची चोरटी वाहतूक केली जात आहे. मार्च महिन्यात या रेतीच्या अवैध वाहतुकीदरम्यान दोन लहान बालकांचा नाहक बळी गेला होता. वैनगंगा नदी घाटांचे लिलाव झाले किंवा नाही याचा कुठलाही परिणाम रेतीच्या अवैध वाहतुकीवर जाणवत नाही. न्यायालयाच्या बंदीनंतर जिल्ह्यातील बहुतांश नदी घाटातून रेतीची दिवसरात्र वाहतूक सुरूच असते. यावर आळा घालण्यासाठी तहसील प्रशासन, जिल्हा खनिकर्म विभाग, आरटीओ व पोलीस प्रशासनातर्फे होणारी कारवाई ही थातुरमातुरच ठरत आहे.

शहरातूनही धावताहेत टिप्पर

’वैनगंगा’ नदी ही भंडारा जिल्ह्यासाठी जीवनदायिनी आहे. या नदीतून ‘ए-वन’ दर्जाची वाळू वैनगंगेच्या विशाल नदीपात्रात आहे. येथील रेतीला नागपूरसारख्या महानगरात मोठी मागणी आहे. ही बाब हेरून तस्करांनी आपली नजर या गौण खनिजावर केंद्रित केली. टिप्पर किंवा ट्रकच्या साह्याने वाळूची बेभानपणे वाहतुक केली जाते. ना कुणी बोलणारा, ना कुणाचा लगाम, यामुळे तस्करांचे चांगलेच फावत आहे.
पोकलँडने रेतीचे खणन
नदी पात्रात केवळ अर्धा मीटर रेती शिल्लक असताना नियमबाह्यरित्या मशीनद्वारे तुमसर तालुक्यातील नदी घाटावर रेती उत्खनन सुरू आहे. महसूल प्रशासनाला कारवाईचे अधिकार असल्यामुळे ते कारवाई करू शकतात, असा सल्ला जिल्हा खनिकर्म अधिकारी देत आहेत. भूजल तथा पर्यावरण विभागाच्या आदेशाला येथे मूठमाती दिली जात आहे.
नियंत्रणाचा अभाव
रेतीची वाहतुक करणाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने तस्करांचे चांगलेच फावत आहे. खनिकर्म विभाग, तहसील कार्यालय व पोलीस प्रशासन कारवाई करीत असले तरी यावर अंकुश लागलेला नाही. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या भरारी पथकांनीही अनेकदा रेती चोरट्यांना पकडले आहे. वाहनासंबंधी कागदपत्रे तपासल्यानंतर त्यांच्या हातात काही उरत नाही. त्यानंतर प्रकरण महसुल प्रशासनाकडे हस्तांतरीत केला जातो. दंड आकारण्यात येते. वाहनमालक दंड भरतो. त्यानंतर वाहने सोडून देण्यात येते. पुन्हा त्याच वाहनातून रेतीची पुन्हा बेभान वाहतुक सुरू होते.

Web Title: Bayt is not running, Sandeep Tipper!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.