बोरी शिवारात बावनथडीचे नहर तुंबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:00 IST2020-07-28T05:00:00+5:302020-07-28T05:00:38+5:30
तुमसर तालुक्यातील कोष्टी, बोरी, नवरगाव आणि उमरवाडा शिवारात शेतीला बावनथडी प्रकल्पाचे पाण्याचे सिंचित करण्यात येत आहे. हा शेत शिवार टेलवरील गावांचा असल्याने नहराचे पाणी जलद गतीने शेतशिवारात पोेहचत नाही. यामुळे पाणी वितरणात शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. पाणी वितरण करणारी नहर आणि कालवे केरकचरा आणि मातीने तुंबली आहेत. पाणी वितरण काळात यामुळे नहर ओव्हरफ्लो होत आहेत.

बोरी शिवारात बावनथडीचे नहर तुंबले
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील बोरी गावाच्या शिवारात असणारे बावनथडी प्रकल्पाचे पाणी वितरण करणारी नहर आणि कालवे केरकचरा व मातीने तुंबले आहेत. नहराचे खोलीकरण तात्काळ करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यामुळे पाणी वितरण करताना सोयीचे ठरणार आहे.
तुमसर तालुक्यातील कोष्टी, बोरी, नवरगाव आणि उमरवाडा शिवारात शेतीला बावनथडी प्रकल्पाचे पाण्याचे सिंचित करण्यात येत आहे. हा शेत शिवार टेलवरील गावांचा असल्याने नहराचे पाणी जलद गतीने शेतशिवारात पोेहचत नाही. यामुळे पाणी वितरणात शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. पाणी वितरण करणारी नहर आणि कालवे केरकचरा आणि मातीने तुंबली आहेत. पाणी वितरण काळात यामुळे नहर ओव्हरफ्लो होत आहेत.
समतल भागातून पाणी वाहत असल्याने नहर फुटत आहेत. नहर आणि कालव्याची दुरावस्था झाली असल्याने नहरांना जागोजागी भगदाड पडत आहेत. यामुळे अनेक शेतकºयांना पाणी मिळत नाही. नंतर त्यांची ओरड सुरू होत असल्याने नहर आणि कालव्याचे गाळ उपसा करण्याची गरज आहे.
दरम्यान सिहोरा परिसरात नहराचे खोलीकरण पाटबंधारे विभागाने केले आहे. या माध्यमातून नहराची स्वच्छता झाली असून सरसकट पाणी वाटपास मदतीचे ठरणार आहे. यात नहरातील झुडपी स्वच्छ करण्यात आली असून हाच पॅटर्न बावनथडी प्रकल्प अंतर्गत बोरी शिवारात राबविण्याची गरज आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव थांबविण्याकरिता शासन स्तरावर वारंवार उपाय योजना करण्यात येत आहेत. लॉकडाऊनने अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत आहे. यामुळे तात्काळ अनुदान निधीची अपेक्षा गैर आहे.
बावनथडी प्रकल्प अंतर्गत या शहराची देखभाल आणि दुरूस्ती करण्याची मागणी बोरीचे सरपंच अविनाश उपरीकार, माजी सरपंच बंडू बनकर, भाऊराव उपरीकार, सुरेंद्र बोरकर, विनोद उपरीकर, देवदास कांबळे, सरपंच प्रभाकर गुर्वे, फत्थू पासवान, नंदू रहांगडाले, दिलीप मस्के यांनी केली आहे.
बोरी शेतशिवारातील बावनथडी प्रकल्प अंतर्गत असणारी नहर आणि कालवे तुंबली असून खोलीकरण, गाळ उपसा करण्याची गरज आहे.
-बंडू बनकर,
माजी सरपंच, डोंगरला.