अखेर धान खरेदी केंद्रावर पोहोचला बारदाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 05:00 AM2020-11-30T05:00:00+5:302020-11-30T05:00:07+5:30

जिल्ह्यात आधारभूत ७३ धान खरेदी केंद्र अंतर्गत धान मोजणी चा हंगाम जोमात सुरू आहे. १८६८ रूपये या हमीभावाने धान खरेदी केली जाते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने सातशे रुपये बोनस सुद्धा जाहीर झालेला आहे. बोनस मुळे शेतकरी समाधानी आहे. मात्र धानाची आधारभूत किंमत  शेतकर्‍यांना न परवडणारी आहे. शासनाने व लोकप्रतिनिधींनी महागाईचा विचार करता आधारभूत किमतीत वाढ करणे नितांत गरजेचे आहे.

Bardana finally reached the grain shopping center | अखेर धान खरेदी केंद्रावर पोहोचला बारदाना

अखेर धान खरेदी केंद्रावर पोहोचला बारदाना

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा पणन कार्यालय पुढाकार

  लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून धान खरेदीला सुरुवात करण्यात आली. यावेळी भात गिरणीतून वापरून झालेला गतवर्षाचा बारदाना मिळाला होता. त्यातून काही फाटका निघाल्याने धान मोजणी वेळेस बारदान याचा तुटवडा भासला. ‘लोकमत’ने बारदाना अभावाने धान खरेदी प्रभावित या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. त्याची जिल्हा पणन कार्यालयाने तत्काळ दखल घेत पालांदूर येथे बारदाना पुरवठा केला. 
जिल्ह्यात आधारभूत ७३ धान खरेदी केंद्र अंतर्गत धान मोजणी चा हंगाम जोमात सुरू आहे. १८६८ रूपये या हमीभावाने धान खरेदी केली जाते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने सातशे रुपये बोनस सुद्धा जाहीर झालेला आहे. बोनस मुळे शेतकरी समाधानी आहे. मात्र धानाची आधारभूत किंमत  शेतकर्‍यांना न परवडणारी आहे. शासनाने व लोकप्रतिनिधींनी महागाईचा विचार करता आधारभूत किमतीत वाढ करणे नितांत गरजेचे आहे.
 जिल्ह्यात सुमारे एक लाख ९३ हजार हेक्टरवर  धानाची  लागवड केलेली होती. यात बरीच शेती पुरात नुकसानग्रस्त ठरली. तर कित्येक हेक्टर शेतीवर तुडतुड्याने  आक्रमण करीत उत्पन्न निम्म्यावर आणले. त्यामुळे यावर्षी उत्पन्नात पर्यायाने आधारभूत खरेदी केंद्रावर निश्चितच कमी खरेदी नोंदण्याची शक्यता दाट आहे.
दरवर्षी खरेदी केंद्रावर बारदान याची समस्या असतेच. बारदान शिवाय खरेदी केली जात नाही. यामुळे खरेदीला विलंब होतो. अशा प्रसंगी शेतकऱ्यांचाच बारदाना वापरून त्या बारदान याचा बाजार दरानुसार शेतकऱ्याला मोबदला दिल्यास, निश्चितच शेतकरी वर्गासह खरेदीला सुद्धा त्रास होणार नाही. अशी अपेक्षा काही शेतकरी वर्गातून उमटलेली आहे. 
विनाविलंब सुरळीत खरेदी केंद्र चालविण्याकरिता पणन कार्यालयाने धान खरेदी केंद्र सुरू करण्यापूर्वीच नियोजन करणे अत्यंत गरजेचे असते. मात्र अधिकारी वर्गांना लोकप्रतिनिधींच् योग्य ते सहयोग वेळेत मिळत नसावा काय? असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. जेवढा उशीर खरेदीला होईल तेवढाच नुकसान शेतकरी वर्गाला सहन करावा लागतो. गत पंधरा दिवसापासून खरेदी आटोपली आहे. मात्र त्या खरेदी चा रुपयासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही जमा झालेला नाही. 
कापणी, बांधणी, मळणी, वाहतूक ,हमाली या सगळ्या गोष्टीवर नगदी रुपया खर्च करावा लागतो. त्यामुळे शेतकरी वर्ग नुकसान सहन करीत खासगी वापराला काही प्रमाणात धान विकून तात्पुरती गरज भागवितो. यामुळे बोनस वगळता दर क्विंटलला २५०  रुपये चा तोटा सहन करावा लागतो.
३१ मार्चपर्यंत धान खरेदीचा मुहूर्त असला तरी त्यापूर्वी खरिपाचा हंगाम उभा करण्याकरिता पैसा नितांत गरजेचे आहे. त्यामुळे पणन कार्यालयाने पारदर्शकता ठेवत धान खरेदी केंद्रावर मोजणी होताच ,किमान हप्ता भरात तरी पैशाची व्यवस्था करावी. अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.
पालांदूर परिसरात जेवणाळा, देवरी/ गोंदि, मेंगापूर, पालांदूर या चार केंद्रावर धान खरेदी सुरु आहे. लाखनी तालुक्यात सर्वाधिक खरेदी असून ३९ हजार ७७५  क्विंटल धान शनिवार पर्यंत मोजणी करण्यात आले. लाखनी तालुक्यात मोठा अर्थात ठोकळ धानाची लागवड सर्वाधिक आहे. यात १०१० जातीच्या धाना सारखा लांब धान ‘अ’ दर्जाचा आहे. त्याची लांबी व जाडी तपासून त्याला अ दर्जात खरेदी करायला पणन कार्यालयाने पुढाकार घ्यावा. यापूर्वी लाखनी तालुक्यात या धानाला ‘अ’ दर्जात खरेदी करण्यात आला होता. हे उल्लेखनीय.

Web Title: Bardana finally reached the grain shopping center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.